Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यादेवदर्शनाहून परतताना काळाचा घाला; कुटुंबातील चार जणांसह एकाचा मृत्यू

देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला; कुटुंबातील चार जणांसह एकाचा मृत्यू

सांगली | Sangli

येथील जतमधील (Jat) विजापूर-गुहागर राज्य मार्गावरील (Bijapur-Guhagar State Road) अमृतवाडी फाट्याजवळ कारचा भीषण अपघात (Terrible Accident) झाल्याची घटना घडली असून एकाच कुटुंबातील चार जण आणि कार चालक अशा एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे…

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, स्विफ्ट कारने समोरून येणाऱ्या ट्रकला चुकविण्यासाठी उभ्या असलेल्या डंपरला धडक दिली. यामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांसह कार चालकाचा मृत्यू (Death) झाला. गाणगापूरला दत्त देवाचे दर्शन घेऊन विजापूर मार्गे जतकडे येत असताना हा अपघात घडला.

प्रेस कामगार नेत्याच्या मुलाचे रशियात अपघाती निधन

या अपघातात चालक दत्ता हरीबा चव्हाण वय ४०, नामदेव पुनाप्पा सावंत ६५, पदमिनी नामदेव सावंत ६०, श्लोक आकाशदिप सावंत वय ८ मयुरी आकाशदिप सावंत वय ३८ सर्व रा. जत यांचा अपघातात मृत्यू झाला. तर अपघातात वरद सावंत हा दहा वर्षीय बालक गंभीर जखमी झाला आहे.

“आम्ही बारसूतल्या कष्टकऱ्यांसोबत, भांडवलदारांच्या…”; सत्ताधाऱ्यांवर राऊतांची खोचक टीका

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच तात्काळ जत ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह शविच्छेदनासाठी ताब्यात घेतले. तसेच याप्रकरणी पुढील तपास जत पोलीस (Jat Police) करत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या