Thursday, April 25, 2024
Homeजळगावसख्ख्या भावांकडून बहिणीला पाच लाखांचा गंडा

सख्ख्या भावांकडून बहिणीला पाच लाखांचा गंडा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

बँकेतून पासबुक (Passbook from Bank) भरून आणतो असे सांगत भावांनी (brothers) बहिणी (sister’s) च्या एटीएमद्वारे (ATM) परस्पर तिच्या खात्यातून (account) 5 लाखाची रक्कम (amount) काढून फसवणुक (Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मेहमुद शमसोद्दीन पिंजारी (वय-52), अशपाक शमसोद्दीन पिंजारी (वय-42, दोघ रा. शिरसोली) या दोन्ही भावांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे शबनम शेख जाकीर पिंजारी हे कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. त्यांचे पती इंजिनीअर असून ते कामानिमित्त सन 2012 ते 2021 पर्यंत सौदी अरेबिया येथे राहत होते. दरम्यान, शबनम शेख या सुध्दा 2012 ते 2018 पर्यंत सौदी अरेबिया येथे राहत होत्या. त्या अधून-मधून शिरसोली येथे गावी येत होत्या. गावी आल्यावर पैशांची आवश्यकता भासल्यास एटीएमद्वारे पैसे काढून घेत होत्या. त्यावेळी त्यांचे दोन्ही भाऊ अशपाक व मेहुमद हे सोबत येत होते.

दि. 24 जुलै 2017 रोजी शबनम शेख या घराची चावी मोठा भाऊ अशपाक याला देऊन पुन्हा सौदी अरेबियासाठी निघून गेल्या. दि. 25 ऑक्टोंबर 2017 रोजी शबनम यांच्या पतीने त्यांच्या बँक खात्यात 5 लाख रूपयांचा भरणा केला होता. तो भरणा झाला आहे की नाही तपासण्यासाठी त्यांनी पत्नीचा भाऊ अशपाक याला बँकेत जाण्यास सांगितले.

दुस-या दिवशी अशपाक याने रक्कम जमा झाल्याचे कळविले होते. अशपाक व मेहमुद या दोघ भावांनी आपल्या बहिणीच्या घराच्या कपाटातून एटीएम चोरले. त्यानंतर बँकेतील पाच लाख रूपयांची रक्कम परस्पर काढून घेतली. दि. 26 सप्टेंबर 2018 रोजी शबनम या पुन्हा गावी परतल्या. त्यावेळी त्यांना आपल्या भावांनी परस्पर विनापरवानगी रक्कम काढून घेतल्याचे कळाले. त्यांनी ती रक्कम परत करण्याचे सांगितले. मात्र, त्यांनी रक्कम अद्यापपर्यंत परत केलेली नाही.

पैशांची मागणी करताच केली धक्काबुक्की

आपल्या भावांनी परस्पर बँक खात्यातून रक्कम काढून घेतल्याचे शबनम यांनी पती जाकीर शेख सांगितले. त्यानंतर जाकीर शेख यांनी दि. 29 एप्रिल 2022 रोजी पत्नीच्या दोन्ही भावांकडे पैशांची मागणी केली. मात्र, दोघांनी त्यांना धक्काबुक्की करित शिवीगाळ केली.

दुसर्‍यांदा केलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल

जाकीश शेख यांना धक्काबुक्की केल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसात धाव घेतली होती. परंतु त्यावेळी पोलिसांकडून तक्रार नोंदवून घेतली नव्हती. दरम्यान, अखेर दि. 23 सप्टेंबर रोजी पुन्हा तक्रार देण्यासाठी पोलीसात आले. यावेळी त्यांच्या तक्रारीवरुन दोघ भावांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या