Friday, April 26, 2024
Homeजळगावजरंडीत पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यात पाच जखमी

जरंडीत पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यात पाच जखमी

सोयगाव, Soygaon

अंगणात खेळणाऱ्या तिघा बालकांसह (three children) रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्या ग्रामस्थांवर (villagers) पिसाळलेल्या कुत्र्यांनी (crushed dogs) जोरदार हल्ला (Strong attack) चढवून पाच जणांना (Five people) जखमी (wounded) केल्याची घटना गुरुवारी जरंडीत घडली या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली असून यातील तिघे गंभीर (Three serious) असल्याने त्यांना तातडीने जळगावला सामान्य रुग्णालयात (Jalgaon General Hospital) उपाचारासाठी (treatment) दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

जरंडी गावात मोकाट कुत्र्यांचा कळपांनी आठवडाभरापासून मोठा धुडगूस घातला असून यातील काही कुत्रे पिसाळले आहे. गुरुवारी पहाटे अंगणात खेळणाऱ्या फरहान शफीक शेख(वय ५),योगेश गुरुदास पाटील (वय ४) या दोघा बालकांवर पिसाळलेल्या कुत्र्यांनी जोरदार हल्ला चढवून यातील फरहान च्या तोंडाला तर योगेशच्या डोक्याला कडाडून चावा घेतला आहे. तर संजय जगताप (वय ४५) व साधना गायकवाड (वय ३०) हे रस्त्याने जात असताना त्यांचे वर कडाडून चावा घेऊन त्यांनाही गंभीर केले असून या घटनेतील फरहान शेख,योगेश पाटील,संजय जगताप हे तिघे गंभीर जखमी झाल्याने या तिघांना तातडीने उपचारासाठी जळगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पिसाळलेल्या कुत्र्यांचे कळप गावात मोकाट मुक्त संचार करत असून यामुळे गावात दहशत पसरली असून गुरुवारी गावभर शांतता पसरली होती दरम्यान दुपारी या कुत्र्यांनी एका शेळीला जखमी केले आहे त्यामुळे पशुपालक मध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे या मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

गावातील मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचे लसीकरण करून त्यांचा पशुसंवर्धन विभागाने बंदोबस्त करण्याची जबाबदारी आहे,परंतु घटनास्थळी पशुसंवर्धन विभागाचे एकही कर्मचारी हजर झाला नव्हता.

- Advertisment -

ताज्या बातम्या