Friday, April 26, 2024
Homeजळगावफायर करणार्‍यांना पाच तर मारहाण करणार्‍या गँगला चार दिवसांची कोठडी

फायर करणार्‍यांना पाच तर मारहाण करणार्‍या गँगला चार दिवसांची कोठडी

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

लाडू गँगच्या (Laddu Gang) आकाशवर गोळीबार (Shooting) केल्यानंतर विक्की हा आपल्या साथीदारांसोबत पळून जात होता. याचवेळी तो जमिनीवर पडल्याने आकाशसह त्याचा भाऊ नितीन व वडील मुरलीधर सपकाळे यांनी त्याला मारहाण करीत त्याच्या डोक्यावर चाकूने सपासप वार केले. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आज सर्व दोन्ही गटातील संशयीत आरोपींना (suspects)न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने (Court) फायर करणार्‍या गँगला पाच तर आकाश सपकाळेसह त्याच्या कुटुंबियांना चार दिवसांची पोलीस कोठडी (Police cell) सुनावली.

- Advertisement -

शहरातील शिवाजी नगरातील बारसे कॉलनीतील रहिवासी मयूर उर्फ विक्की दीपक अलोने (वय 28) हा आपल्या कुटुंबियांसोबत वास्तव्यास आहे. त्याचा मित्र राजू उर्फ बाबू अशोक सपकाळे याने विक्कीला आपल्याला आज लाडू गँगचा आकाश सपकाळे, गणेश सोनवणे, तुषार सोनवणे, निंबाळकर यांनी माझ्या भावाचा मर्डर केला असून तुम्हील आज त्या गँगचा मेन अध्यक्ष आकाश सपकाळेचा गेम वाजविण्याचे त्याने सांगितले होते.

त्यानुसार गुरुवारी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास विक्की हा मिलींद सकट, बंटी महाले, रिक्शावाला राहूल असे तिघ वाल्मिक नगरातील जैनाबाद येथे जाण्यासाठी निघाले. यावेळी बंटी महाले याच्याकडे रिव्हॉलव्हर होती. दरम्यान, 8 वाजेच्या सुमारास हे संशयीत आरोपी आकाशच्या घराजवळ पोहचले यातील मिलींद सकट व बंटी महाले हे दोघ आकाशच्या घरात घुसले.

यावेळी आकाश हा पलंगावर लोळलेला असल्याने बंटी महालेने आकाशवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. यामध्ये आकाशच्या हाताला गेळी लागल्याने तो आरडाओरड करु लागल्याने बंटीने पुन्हा गोळीबार केला असल्याची तक्रार जखमी विक्की अलोने यांने दिली. त्यानुसार गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

न्यायालयाच्या परिसरात तणावाचे वातावरण

शिवाजी नगरतील राजू उर्फ बाबू सपकाळे, प्रद्मुम्न महाले, राहूल भालेराव, मिलींद सकट यांना न्यायालयाने पाच दिवसांची तर लाडू गँगमधील आकाश सपकाळे, नितीन उर्फ सागर सपकाळे, मुरलीधर सपकाळे व रुपेश सपकाळे यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, विक्की अलोने हा गंभीर जखमी असल्याने त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. तसेच दोघ गट न्यायालयात समोरासमोर आल्याने त्यांच्याकडून एकमेकांना खुन्नस देत असल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

जीवेठार मारण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

विक्कीला माराहण केल्यानंतर आकाशने बुलेटवरुन रिक्षाचा पाठलाग केला. परंतु मारेकर्‍यांनी घटनास्थळाहून पळून जाण्यात यशस्वी ठरले. त्यानंतर विक्कीहा बेशुद्ध पडला असल्याचे त्याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान याप्रकरणी आकाश, नितीन व त्यांचे वडील मुरलीधर सपकाळे व रुपेश सपकाळे या चार जणांविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाकूसह दगडाने केले वार

गोळीबार केल्यानंतर मिलींद व बंटी हे रिक्शातून पळून जात असतांना विक्की हा देखील त्याठिकणाहून पळू लागला. परंतु त्याचा पाय गटारीत पडल्याने तो खाली पडला. तेवढ्यात आकाशने त्याच्या हातातील चाकूने विक्कच्या डोक्यात वार केले तर नितीने दगडाने मारहाण करीत जखमी केले.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या काही तासातच दोन्ही गँगमधील संशयीत आरोपींना अटक केली. दरम्यान, आज त्यांना शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बळीराम हिरे, पोलीस उपनिरीक्षक कवडे, अभिजीत सैंदाणे, राहूल घेटे, अनिल कांबळे, राहूल पाटील, किरण वानखेडे यांच्यासह आरसीपीचे तुकडीच्या बंदोबस्तात दोन्ही गँगमधील संशयीतांना दुपारी न्यायालयात हजर केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या