Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यातील शाळांना दिवाळीची पाच दिवस सुट्टी

राज्यातील शाळांना दिवाळीची पाच दिवस सुट्टी

संगमनेर | वार्ताहर | Sangamner

करोनामुळे राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा प्रत्यक्षपणे बंद असल्या तरी आणि ऑनलाइन स्वरूपातील वर्ग सुरू असल्याने संबंधित शाळांना दिनांक 12 ते 16 नोव्हेंबर या कालावधीत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

- Advertisement -

राज्यातील शाळा 15 जून पासून सुरु करण्यात आल्या असल्या तरी प्रत्यक्ष वर्ग सुरू झालेली नाहीत. जुलै महिन्यात शाळा ऑनलाइन स्वरूपात सुरू कराव्यात अशा स्वरूपाचे निर्देश दिले होते.

या निर्णयानंतर राज्यातील शाळा व विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाने जोडली गेली आहेत. यात राज्याच्या विद्या प्राधिकरणाने ही सातत्याने ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्यासंदर्भात लिंक उपलब्ध करून देऊन संधी उपलब्ध करून दिली आहे.

सध्या सुरू असलेल्या या प्रक्रियेमुळे दिवाळीची सुट्टी मिळावी अशा स्वरूपाची मागणी शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. ही मागणी लक्षात घेऊन राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने 12 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर अशी पाच दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.

कामाचे दिवस भरणे अनिवार्य-

माध्यमिक शिक्षणासाठी माध्यमिक शाळा संहिता लागू आहे. त्या संहितेप्रमाणे दोनशे तीस दिवस शाळा सुरू ठेवणे अनिवार्य आहे. शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे प्राथमिक स्तरावरील शाळा 220 दिवस सुरु ठेवणे आवश्यक असून, केवळ वर्षभरात शहात्तर सुट्ट्या शाळांना घेता येणार आहे. कायद्यातील तरतुदी लक्षात घेऊन राज्य शासनाने शाळांना दिवाळीची पाच दिवस सुट्टी जाहीर केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या