Saturday, April 27, 2024
Homeनाशिकओझरखेड धरण @८८ टक्के; दिंडोरी तालुक्यातील पाच धरणे फुल्ल

ओझरखेड धरण @८८ टक्के; दिंडोरी तालुक्यातील पाच धरणे फुल्ल

ओझे | वार्ताहर | Oze

दिंडोरी तालुक्यात (Dindori Taluka) परतीच्या पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावल्यामुळे तालुक्यातील सहा धरणांपैकी पाच धरणे भरल्यामुळे दिंडोरी तालुक्यासह निफाड, येवला, मनमाड, चादवंड तालुक्यातील शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे…

- Advertisement -

सप्टेंबरपर्यंत दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरण (Palkhed Dam) वगळता अन्य पाच धरणाची पाणी साठ्याची परिस्थिती चिंताजनक होती. मात्र, ऑक्टोबरमध्ये पडलेल्या परतीच्या पावसामुळे तालुक्यातील धरणांना नवसंजीवनी मिळाली आहे.

तालुक्यातील सर्वात मोठे व इतर तालुक्यांना वरदान ठरलेले करंजवण धरण (Karanjavan Dam) सध्या ९८ टक्के भरले असून परतीचा पाऊस जरी थांबला असला तरी अजूनही धरणात पाण्याची आवक चालू असल्यामुळे कदाचित थोड्याफार प्रमाणात का होईना चार ते पाच दिवसात करंजवण धरणातून पाणी सोडण्याची शक्यता आहे.

मागील वर्षी करंजवण धरणातील पाणीसाठा फक्त ९२ टक्के एवढाच होता. तसेच वाघाड धरण १०० टक्के भरले असून पालखेड धरणातही १०० टक्के पाणीसाठा आहे. त्याप्रमाणे पुणेगाव धरण १०० टक्के झाले असून तिसगाव धरणही पूर्ण क्षमतेने भरले आहे. तालुक्यातील ओझरखेड धरणातील पाणीसाठा ८८.१७ टक्के इतका झाला आहे.

दिंडोरी तालुक्यातील धरणावर जिल्यातील निफाड, येवला मनमाड, चादवंड तालुक्यातील शेतीची मदार अवलंबून असते त्यामुळे दिंडोरी तालुक्यातील धरणावर सर्वाचे लक्ष केंद्रीत असते.

अनेक वेळा तर इतर तालुक्यातून पाण्याची मागणी झाल्याशिवाय धरणातून पाणी सुटत नाही त्यामुळे स्थानिक जनता नाराज असते यासाठी तालुक्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व पाठबंधारे विभागाने सर्व धरणातील पाण्याचे योग्य नियोजन केल्यास स्थानिक तालुक्यातील कादवा नदी परिसरातील जनतेला पाण्याची कृतिम पाणी टंचाई निर्माण होणार नाही, अशी चर्चा सर्वत्र होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या