Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसराईत गुन्हेगार धामणे हत्या प्रकरणी ५ जणांना अटक

सराईत गुन्हेगार धामणे हत्या प्रकरणी ५ जणांना अटक

इगतपुरी । Igatpuri

सराईत गुन्हेगार संजय धामणे याच्या पूर्वैमनस्यातून झालेल्या खून प्रकरणी ५ संशयितांना पोलीसांनी अटक करून ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

या प्रकरणात १) सायमन उर्फ पापा पॅट्रिक मँनवेल, वय २२ वर्षे, रा. गायकवाड नगर, इगतपुरी, २) राहुल रमेश साळवे, वय २७ वर्षे, रा. मिलिंदनगर, इगतपुरी ह. मु. घोटी, राजवाडा ता. इगतपुरी, ३) सोनू ( मस्तान ) उर्फ संजय मोहन राऊत, वय २३ वर्षे, रा. बचराव ता. महाराजगंज, जि. रायबरेली, उत्तर प्रदेश, ४) विशाल हनुमान खाडे, वय २३ वर्षे, रा. टिटोली, ता. इगतपुरी ५) आशाबाई पॅट्रिक मँनवेल, वय ५५ वर्ष, रा. गायकवाड नगर, इगतपुरी या पाच जणांना इगतपुरी पोलिसांनी अटक केली असून,अजून ३ संशयित आरोपींचा पोलिस कसून शोध घेत आहेत.

शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास संजय धामणेची इगतपुरी शहरातील डाक बंगला येथे निर्घृण हत्या करण्यात आली होती. संशयितांपैकी आशाबाई पॅट्रिक मँनवेल या संशयित महिलेला तात्काळ अटक करण्यात आली होती.

तर अन्य संशियत फरार होते. पोलिसांनी कसून शोध घेत सोमवारी ४ संशयित आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील अजय पॅट्रीक मॅनवेल, अजय उर्फ टकल्या पवार, राजकुमार भारती हे अद्यापही फरार असुन यांचा पोलिस शोध घेत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या