Saturday, April 27, 2024
Homeनाशिकफिटनेस प्रशिक्षिका आचार्य यांना 'राष्ट्रीय रत्न पुरस्कार'

फिटनेस प्रशिक्षिका आचार्य यांना ‘राष्ट्रीय रत्न पुरस्कार’

नाशिक | Nashik

शहरातील फिटनेस ट्रेनर प्रशिक्षक पूनम आचार्य (Poonam Acharya) यांना राष्ट्रीय रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार पंजाब (Punjab) येथील वुमन पॉवर (Women Power) या सोसायटीतर्फे जाहीर करण्यात आला आहे…

- Advertisement -

हा पुरस्कार उद्या १५ ऑगस्ट २०२२ रोजी चंदीगड (Chandigarh) येथे वितरीत होणार आहे. भारतातील विविध क्षेत्रातील ५० महिलांचा यात समावेश आहे.

पूनम आचार्य या नाशकात गेल्या २० वर्षांपासून फिटनेस ट्रेनर (Fitness trainer) म्हणून काम करतात. त्यांनी आतापर्यंत २५ हजारपेक्षा अधिक स्त्रियांना वेट लॉससाठी (Weight loss) तसेच इतर आरोग्य विषयक समस्या सुधारण्यासाठी मदत केली आहे.

बम बम भोले…! त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शहरातील अनेक संस्थांशी त्या जोडल्या गेल्या असून महिला आरोग्यावर (Health) त्या सतत मार्गदर्शन करत असतात. त्यांनी अनेक मॅरेथॉन, धमाल गल्ली, महाविद्यालये, शालेय विद्यार्थी यांनाही फिटनेसचे धडे दिले आहेत.

महिला आरोग्यावरील त्यांच्या कामाचे सर्वदूर कौतुक झाले असून त्यांना अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. त्यांना मानाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातुन कौतुक होत आहे. या पुरस्काराने माझी जबाबदारी आणखी वाढली असून नाशिकसाठी सदैव काम करत राहणार, अशी प्रतिक्रिया पूनम आचार्य (Poonam Acharya) यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या