Friday, April 26, 2024
Homeनगरफिट येऊन पडल्याने एकाचा मृत्यू

फिट येऊन पडल्याने एकाचा मृत्यू

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील लोहारवाडी येथील एकाचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना घडली असून याबाबत सोनई पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. याबाबत बाळू मधुकर भोसले वय 34, धंदा-मॅनेजर रा. घोडेगाव यांनी खबर दिली असून त्यात म्हटले की, नितीन शंकर भोसले (वय 29) रा. लोहारवाडी ता. नेवासा याने दारुचे अतिसेवन केले होते व तो फिट येऊन खाली पडून मयत झाला. या खबरीवरून सोनई पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस नाईक श्री. तुपे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या