Wednesday, April 24, 2024
Homeनगरमासेमारी करणार्‍या तरुणाला राज्यपालांनी दिली भेटीची वेळ

मासेमारी करणार्‍या तरुणाला राज्यपालांनी दिली भेटीची वेळ

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील निपाणी वडगाव येथील मासेमारी करणारा आदिवासी तरुण जालिंदर मोरे व शेतकरी संतोष गायधने यांनी मुख्यमंत्री व राज्यपाल यांना

- Advertisement -

पत्र लिहून भेटीची वेळ मागितली होती.त्याची दखल घेत राज्यपाल कार्यालयाने सोमवार दि. 26 ऑक्टोबर रोजी वेळ दिली आहे.

तालुक्यातील निपाणी वडगाव येथील गावठाण हद्दीमध्ये राहणार्‍या नागरिकांनी मुख्यमंत्री व राज्यपाल यांना पत्र लिहून, गावाच्या मध्यभागी असलेल्या खाणीतील साठलेल्या पाण्यामुळे जीवन जगणे मुश्कील झाल्याने जबाबदार अधिकार्‍यांना गावाच्या मध्यभागी असलेल्या खाणीतील साठलेल्या पाण्यामुळे लोकांचे आरोग्य व जीवन कसे धोक्यात आले आहे याची पाहणी करायला सांगा नाही तर आम्हाला आमच्या कुटुंबासह आत्महत्या करण्याची परवानगी तरी द्या अशी उद्दिग्न मागणी केली आहे.

,गावामध्ये मासेमारी करून स्वत:चा उदरनिर्वाह करणार्‍या जालिंदर गोपीनाथ मोरे या आदिवासी समाजाच्या तरुणाचे घर गेल्या अनेक वर्षांपासून पाण्यात आहे. त्यामुळे तो तरुण स्वतःचे हक्काचे घर असताना देखील सध्या आपल्या कुटुंबासह गावातील पाझर तलावाशेजारी झोपडी टाकून राहत आहे. अनेक समस्या आहेत, लोकांना रस्ते नाहीत, अतिक्रमणे झालेली आहेत, गटार योजना फक्त कागदावर आहे.

कचरा उचलण्याची कोणतीही व्यवस्था नाही, गावात स्वच्छ रस्ते, गटार योजना, कचरा व्यवस्थापन या सुविधा फक्त अशोक कारखाना कॉलनी परिसरात राहणार्‍या दीड हजारच्या आसपास लोकसंख्या असलेल्या वॉर्डला दिल्या जातात व गावातील इतर 15 हजारच्या आसपास नागरिकांना कोणत्याही सुविधा दिल्या जात नाही.

काही ठराविक लोकांना सर्व सुविधा व इतर लोकांनी किड्या मुंगी सारखे जगायचे अशी परिस्थिती सध्या गावात आहे. त्यामुळे या भेदभावाबाबत मानव अधिकार आयोगाकडे ग्रामपंचायतच्या कारभाराविषयी स्वतंत्र तक्रार दाखल करणार आहे, असे गायधने यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या