Saturday, April 27, 2024
Homeनाशिकजिल्ह्यात सव्वादोन लाख नागरीकांना पहिला डोस

जिल्ह्यात सव्वादोन लाख नागरीकांना पहिला डोस

नाशिक । Nashik

जिल्ह्यातील शासकीय तसेच खासगी रूग्णालयांद्वारे आतापर्यंत 2 लाख 35 हजार 83 नागरीकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात 3 हजार 423 जणांचे लसीकरण पुर्ण करण्यात आले आहे.

- Advertisement -

करोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता 16 जानेवारी 2021 पासून जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरणाचा आता तिसरा टप्पा सुरू आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसर्‍या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर्स, तर आता तिसर्‍या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांसह 45 वर्षांपुढील व्याधीग्रस्त व्यक्तींना तसेच आता सरसकट 45 वर्षावरील प्रत्येक नागरीकालाही लस दिली जाते आहे.

सोमवारी ( 29 मार्च) पर्यंत एकुण 2 लाख 35 हजार 83 जणांनी करोना प्रतिबंधक लस टोचून घेतली आहे. यामध्ये 60 वर्षावरील 1 लाख 10 हजार 305 तर 45 वर्षावरील 33 हजार 567 नागरीकांनी लस घेतली आहे. तर 30 हजार 889 जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.

आज दिवसभरात जिल्ह्यात 3282 जणांना पहिला डोस तर 141 जणांना दुसरा डोस देण्यात आला. यामध्ये नाशिक पालिका हद्दीत 225, ग्रामिण जिल्ह्यात 3 हजार मालेगाव मनपा 57 असे लसीकरण झाले आहे. यापैकी 65 टक्के जणांनी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अधिपत्याखाली असलेल्या केंद्रांवर लस घेतली आहे. दरम्यान शासकीय 38 व खासगी 40 अशा एकुण 78 रूग्णालयांमधून हे लसीकरण सुरू आहे.

30 हजार जणांना दुसरा डोस

करोना संसर्गापासून वाचवू शकणार्‍या प्रतिबंधक लसीचे वितरण युद्धपातळीवर सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील 30 हजार 889 जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. या लसीचे दोन डोस घेणे अनिवार्य असून, पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस घेणे आवश्यक आहे. यानंतरच रोग प्रतिकारक शक्ती वाढत असल्याचा दावा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या