Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यामालेगावातील चित्रपट गृहात फटाके फोडणे पडले महागात, दोघांना अटक

मालेगावातील चित्रपट गृहात फटाके फोडणे पडले महागात, दोघांना अटक

मालेगाव येथील सुभाष चित्रपट गृहात (Subhash Movie Theater) सलमान खानच्या चाहत्यांनी (Salman Khan fans) फटाके फोडून एकच धुडगूस घातला रात्री नऊच्या शोच्या वेळी हा प्रकार घडला. काही काळ गोंधळ उडाला होता, याप्रकरणी छावणी पोलिसांनी (Chhavani Police Station) फटाके फोडणाऱ्यांवर विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आता या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.

मालेगावातील घटनेने सलमान खान नाराज, म्हणाला…

- Advertisement -

येथील सुभाष चित्रपटगृहात सिनेअभिनेते सलमान खान अंतिम हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. काल रात्री 9 चा शो सुरू झाल्यावर सलमान खानची एन्ट्री होताच त्याच्या चाहत्यांनी एकच आरडाओरड सुरू केली. काही अति हौशी तरुणांनी चक्क फटाक्यांची आतषबाजी सुरू केली. चित्रपटगृहातच रॉकेट उडविण्यात आले. यामुळे सुरेंद्र तिसगे यांच्या तक्रारीवरून आतषबाजी, सामान्य प्रेक्षकांच्या जीविताला धोका निर्माण होण्यास कारणीभूत ठरल्याबद्दल या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

या प्रकरणी रिजवान मोहंमद रमजान (वय २४, रा. शाहीन पार्क) व अजीम शेख निराम (२४, रा. गुलाब पार्क, फरान हॉस्पिटलमागे) या दोघांना छावणी पोलिसांनी अटक केली. या दोघा संशयितांविरुद्ध चित्रपटगृह व्यवस्थापक सुरेंद्र तिसगे यांच्या तक्रारीवरून गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या