Friday, April 26, 2024
Homeनगरफटाका बंदीवरून नगरमध्ये संभ्रम

फटाका बंदीवरून नगरमध्ये संभ्रम

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दिवाळी जवळ आल्याने जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी फटाके विक्रेत्यांना (Firecracker Vendors) परवाने देऊन विक्रीही (Sales) सुरू झाली आहे. निर्बंध शिथील (Restrictions Relaxed) होत असल्याने दिवाळी उत्साहात साजरी (Celebrate Diwali) करण्याकडे नागरिकांचा कल असताना नाशिक विभागीय आयुक्तांच्या (Nashik Divisional Commissioner) पत्रामुळे वेगळाच धमाका झाला आहे. दिवाळी फटक्यांना बंदी (Ban on Diwali Firecracker) घालण्याचा ठराव करून त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. राधाकृष्ण गमे (Nashik Divisional Commissioner Dr. Radhakrishna Game) यांनी सर्व महापालिका (Municipal Corporation) आणि जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे नाशिक विभागात म्हणजेच उत्तर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांपुढे पेच निर्माण झाला असून संभ्रमाचे वातावरण तयार झाले.

- Advertisement -

दरम्यान, पर्यावरण मंत्रालयाच्या (Ministry of Environment) माझी वसुंधरा अभियानाच्या प्रारूप आराखड्याच्या आधारे हा निर्णय घेण्यास सांगण्यात येत असले तरी जिल्ह्यातून फटका बंदीचे ठराव आले नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर नगर महापालिकेने हा विषय महासभेकडे टोलावला आहे. दुसरीकडे फटका असोसिएशनच्यावतीने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. यात बंदी घालायचीच होती, तर 15 दिवसांपूवी फटाका विक्रीचे परवाना का दिले? आम्ही शासनाला रितसर शुल्क भरून परवाने घेतो. माल खरेदी करण्यापूर्वीच व्यापार्‍यांना बंदीबाबत कल्पना देणे आवश्यक होते. ऐनवेळी बंदी कशसाठी घालता. कोणत्या नियमाला धरून फटका विक्रीला बंदी आणत आहेत. एका दिवसांत फटक्यामुळे प्रर्दुषण होते का, असे एकना अनेक सवाल फटाका व्यापारी उपस्थित करत आहेत.

विभागीय आयुक्त डॉ. गमे (Nashik Divisional Commissioner Dr. Radhakrishna Game) यांनी नाशिक विभागातील नाशिक (Nashik), नगर (Nagar), जळगाव (Jalgav), धुळे (Dhule) व नंदुबार (Nandurbar) जिल्ह्यासाठी फटका बंदीच्या सूचना दिल्या आहेत. प्रदूषण रोखण्यासाठी नाशिक विभागातील सर्व महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने फटाके विक्री आणि वापर यावर बंदी घालण्याचा ठराव मंजूर करावा. नियमित सभेत हा ठराव होऊ शकला नाही, तर त्यासाठी विशेष सभा बोलाविण्यात यावी. 22 ऑक्टोबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करून फटाके बंदीची अधिसूचना काढण्यात यावी, अशा सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. सर्व जिल्हाधिकारी (Collector), मनपा आयुक्त (Municipal Commissioner) आणि नगरपालिकांच्या मुख्याधिकार्‍यांना डॉ. गमे यांनी हे पत्र पाठविले आहे. दिवाळीत होणारे ध्वनी (Sound) आणि हवेचे प्रदूषण (Air Pollution) रोखण्यासाठी फटाक्यावर बंदी आणण्याचा ठराव महासभेत करण्यात यावा, त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी अधिसूचना जारी कराव्यात, असे पत्रात म्हटले आहे.

माझी वसुंधरा अभियान पूर्वीपासूनच सुरू असून या संबंधीच्या सूचनाही आधीच देण्यात आलेल्या आहेत. मात्र, मधल्या काळात बहुतांश ठिकाणी फटाके विक्रीसाठी परवानगी देण्यात आलेली आहे. याशिवाय अनेक ठिकाणी फटाका मार्केट सुरूही झालेले आहे. त्यामुळे आता बंदी कशी आणायची? हा प्रश्न तर आहेच शिवाय फटाके विक्रीसाठी परवानगी देताना जे शुल्क मिळते, ते उत्पन्नही बुडण्याची भीती स्थानिक स्वराज्य संस्थांना आहे. करोनाची दुसरी लाट ओसरत असताना बहुतांश निर्बंध खुले झाले आहेत. त्यामुळे सण-उत्सवांवरील निर्बंधही शिथील होत आहेत. अशा परिस्थितीत यावर्षी दिवाळी उत्साहात साजरी होणार, या आशेवर नागरीक आहेत. त्यामुळे जर या पत्राची काटेकोर अंमलबजावणी झाली तर फटाके प्रेमींचीही निराशा होणार आहे.

अद्याप महापालिका, नगर परिषद आणि नगरपालिका यांच्याकडून फटका बंदीबाबतचे ठराव आलेले नाहीत. अनेक ठिकाणी किरकोळ आणि ठोक फटाका विक्रीचे परवाने दिलेले असल्याचे फटका व्यापारी सांगत आहेत. यामुळे याबाबत लवकरच योग्य निर्णय घेण्यात येईल.

– डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी, नगर.

नगरशहरातील फटका बंदीचा विषय महासभे पुढे ठेवण्यात येणार आहे. त्यावर महासभा निर्णय घेणार असून त्यानूसार महापालिका प्रशासन निर्णय घेईल.

– शंकर गोरे, महापालिका आयुक्त.

जानेवारी महिन्यांत फटका व्यापारी फटके विकत घेवून पुढील सात ते आठ महिने हा माल संभाळून ठेवतात. त्यानंतर संबंधीत शासकीय यंत्रणेकडून रितसर परवागनी घेवून फटका विक्री करतात. अनेक व्यापारी कर्ज काढून, सोने गहाण ठेवून माल भरत असतात. यामुळे विभागीय आयुक्त अचानक फटके बंदी कशी आणू शकतात. फटके बंदीला आमचा विरोध नाही. मात्र, फटके तयार करण्यावर आधी बंदी आणावी. आधीच करोनामुळे अनेकांचे आर्थिक हाल सुरू असतांना ऐन सणासुधीच्या तोंडावर बंदीचे पत्र पाठवून बाजारात संभ्रम अवस्था करणे चुकीचे आहे. नियमबाह्य पध्दतीने फटका विक्री बंदी आणण्यात येत असून एकट्या फटक्यामुळे प्रर्दूषण वाढते का?. फटके विक्रीवर बंदी आणल्यास न्यायालयात जावू.

– श्रीनिवास बोज्जा, अध्यक्ष, फटका व्यापारी असोसिएशन.

- Advertisment -

ताज्या बातम्या