Saturday, April 27, 2024
Homeनाशिकभाताच्या गंजीला आग; शेतकऱ्याचे नुकसान

भाताच्या गंजीला आग; शेतकऱ्याचे नुकसान

सुरगाणा | प्रतिनिधी Surgana

सुरगाणा तालुक्यातील( Surgana) मिळणपाडा( Milanpada ) येथील शेतकरी मधुकर जाधव,गंगाराम जाधव,या शेतकऱ्यांने शेतात भाताची कापणी करुन उठली रचून ठेवलेल्या गंजीला अचानक आग लागल्याने शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

वर्षभर काबाडकष्ट कष्ट करून कापणी केलेला भाताच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने रात्री साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हि आग नेमकी कशामुळे लागली या बाबतचे कारण समजू शकले नाही. आग लागली की लावली गेली या बाबत चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.

मध्यंतरी अवकाळी पावसामुळे शेतीचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अशा संकटातून कसेबसे शेतकरी सावरत असतांना आग लागल्याने 45 ते 50 क्विंटल भाताचे नुकसान झाले आहे.हाता तोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा हिरावून घेतला आहे.आगीचा भडका उडाल्याने

मिळणपाडा गावातील लोकांनी तात्काळ धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो पर्यंत निम्या पेक्षा जास्त भात आगीत जळूनखाक झाले होते.

नुकसान झालेल्या भात पिकाची माहिती शासनाला सादर केली आहे. झालेल्या नुकसानाची पाहणी करुन पंचनामा करण्यात येऊन नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या