कोरोना लस बनवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग

jalgaon-digital
1 Min Read

पुणे

करोना प्रतिबंधक लस बनवणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग लागली आहे. सीरम इन्स्टिट्यूटमधील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली आहे. दुपारी दोन वाजता आग लागल्यानंतर परिसरात धुराचे लोट उसळले. दरम्यान कोव्हिशिल्ड लस सुरक्षित आहे.

सीरम इन्स्टिट्यूटला कोव्हिशिल्ड लसीच्या वापरासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. सीरमच्या मांजरी येथील या ठिकाणी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घेतली जाणारी बीसीजी लस तयार केली जाते. त्या विभागाला ही आग लागल्याचे प्राथमिक वृत्त आहे. महत्वाचे म्हणजे करोनावरील ‘कोव्हिशिल्ड’ लस तयार केली जाते तेथून हा भाग काही अंतरावर आहे. सुदैवाने अद्याप आगीची झळ तिथपर्यंत पोहोचलेली नाही.

आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून मोठ्या प्रमाणात आगीचे लोट दिसत आहेत. अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारीदेखील घटनास्थळी रवाना झाले आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *