Tuesday, April 23, 2024
Homeधुळेनिमखेडी येथे घराला आग, रोकडसह वस्तू खाक

निमखेडी येथे घराला आग, रोकडसह वस्तू खाक

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

तालुक्यातील निमखेडी येथे घराला आग लागून रोख रक्कमेसह संसारोपयागी वस्तू जळून खाक झाल्या आहेत.

- Advertisement -

सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. शासनातर्फे भरपाई मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्त आदिवासी कुटुंबाने केली आहे..

तालुक्यातील निमखेडी येथे आदिवासी कुटुंब वास्तव्यास आहे. दि. 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास आदिवासी कुटुंब घराबाहेर असतांना अचानक घराला आग लागली.

गावकर्‍यांनी पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. घरात देवघराजवळ लावलेल्या दिव्यामुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेत घरात ठेवलेली रोख रक्कमेसह संसारोपयागी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. शासनातर्फे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी गिरजाबाई पवार यांंनी केली आहे.

तलाठी वसंत अहिरराव, कोतवाल मनोज ठाकरे, पोलिस पाटील यांनी नुकसानीची पाहणी केली. घटनेचा पंचनामा करून अहवाल प्रशासनाला सादर करण्यात आला असल्याचे तलाठी अहिरराव यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या