Thursday, April 25, 2024
Homeक्रीडायुवराज सिंग विरोधात गुन्हा दाखल

युवराज सिंग विरोधात गुन्हा दाखल

दिल्ली | Delhi

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग मोठ्या अडचणीत सापडला आहे. युवराज सिंग विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरयाणा पोलिसांनी युवराज सिंगविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

पेशाने वकील व राष्ट्रीय आघाडी आणि दलित ह्यूमन राइट्सचे संयोजक असलेले रजत कलसन यांनी त्यावेळी युवराज विरोधात तक्रार दाखल केली होती. आता सुमारे ८ महिन्यांनंतर या प्रकरणाचा मुद्दा पुढे आला आहे. रविवारी (१४ फेब्रुवारी) या प्रकरणी हरियाणाच्या हांसी पोलिस ठाण्यात कठोर कलमांखाली युवराजविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले आहे. आयपीसीच्या कलम १५३, १५३ अ, २९५, ५०५ तसेच एससी/एसटी कायद्याचा कलम ३ {(१)(r) आणि ३(१)(s)} अंतर्गत ही एफआयआर नोंदवण्यात आली आहे.

युवराज सिंगने काही महिन्यांपूर्वी रोहित शर्मासोबत इंस्टाग्रामवर चॅट करताना युजवेंद्र चहलबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. रोहितसोबतच्या चॅटदरम्यान युवीनं चहलला ‘भंगी’ असं संबोधले होते आणि त्याच्या या विधानावर सोशल मीडियावर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली. ”ये भं**** लोगो को काम नही है, ये युझी और इसको ( कुलदीप)” असे युवी रोहितला म्हणाला होता. युवीच्या त्या विधानाविरोधात सोशल मीडियावर ‘युवराज सिंग माफी माग’ असा ट्रेंड बुधवारी व्हायरल झाला होता. त्यानंतर युवीनं माफी मागितली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या