Saturday, April 27, 2024
Homeनाशिकसिट बेल्ट सक्तीपुर्वी वाढत्या अपघातांवर ऊपाय शोधा: कोतवाल

सिट बेल्ट सक्तीपुर्वी वाढत्या अपघातांवर ऊपाय शोधा: कोतवाल

सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्री (Businessman Cyrus Misri) यांचे कार अपघातात (accident) निधन झाले.

- Advertisement -

अपघाताच्या वेळी मागच्या सीटवर बसलेल्या मिस्री यांनी सीट बेल्ट (seat belt) न लावल्यामुळे त्यांचे निधन झाले. या पार्श्वभूमीवर सरकारने चारचाकी वाहनांतील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट सक्तीचे केले आहे.

सीट बेल्ट (seat belt) ची सक्ती करण्यापूर्वी खड्ड्यांमुळे (potholes) होणाऱ्या वाढत्या अपघातातील वाहतुकीच्या समस्येवर उपाय शोधायला हवे. अशा आशयाचे पत्रक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Nationalist Congress Party) माजी शहराध्यक्ष नामदेव कोतवाल यांनी प्रसिध्दीस दिले आहे. सिन्नर तालुक्यातील (sinnar taluka) चापडगांव येथील तरूण शेतकरी (farmer) हरीदास लक्ष्मण सांगळे यांचा खड्ड्यांमुळे दुचाकी वरून पडुन मृत्यु झाल्याची घटना नुकतीच ऐन दिवाळीत घडली आहे.

सिन्नर शहर व तालुक्यातील अनेक रस्ते हे मृत्युचे सापळे बनलेले आहे. एवढी दुरावस्था या रस्त्यांची झालेली आहे. सीट बेल्ट (seat belt) च्या सक्तीचा आदेश हा सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे. परंतू अशा प्रश्नांचा विचार होत असतांनाच रस्त्यांच्या असणाऱ्या असुविधेचा ही सर्वंकष विचार व्हायला हवा. समृध्दी महामार्गासाठी (Samruddhi Highway) तालुक्यातील रस्त्यांची झालेली बरबादी हा विषय आज चिंतेचा व मोठा बनला आहे.

रस्त्यांची लागलेली वाट, बारमाही असलेले खड्डे (potholes), तुटलेले गतीरोधक वाहतुकीशी संबंधित रोड लाईनची आखणी, झेब्रा क्रॉसिंग, पथदिवे, विद्युत खांबांचा अभाव, दुभाजकांवर असलेल्या दिव्यांचा अभाव. महामार्गावरील सर्वच रस्त्यांवरील साईड पट्ट्या या खचलेल्या व उध्दवस्त झालेल्या अवस्थेत आहेत.. तसेच वळण मार्गावर सुचना फलक (notice board) नसल्याने लहान मोठ्या अपघातांची (accidents) मालिका आज तालुक्यात सुरूआहे.

सीट बेल्ट न लावल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल..असे सांगण्यात येत आहे…तर महामार्गावरील मोठ्या – मोठ्या खड्ड्यांमुळे होणारे अपघात व त्यातुन होणारी मनुष्यहानी व वाट्याला येणारे अपंगत्व यांची जबाबदारी महामार्ग प्राधीकरण किंवा राज्य सरकार घेणार आहे का ? असा सवाल श्री.कोतवाल यांनी विचारला आहे.

पावसाळ्यामुळे डांबरी रस्त्यांवर खड्डे पडतात.ही रस्ते बनविणाऱ्या यंत्रणांनी जाणीवपूर्वक पसरलेली अंधश्रद्धा आहे..रस्त्यात पैसे मुरतात. ही खरी वास्तविकता आहे..याकडे कोतवाल यांनी लक्ष वेधुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खड्डेमुक्तीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करुन खड्डे बुजविण्याचे काम करावे..असे आवाहन श्री कोतवाल यांनी शेवटी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या