Thursday, April 25, 2024
Homeनगरआर्थिक व्यवहारातून वाहनांना आग

आर्थिक व्यवहारातून वाहनांना आग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आर्थिक व्यवहारातून (Financial Transactions) एकाने रिक्षा (Riksha), दुचाकी (BIke) व घरातील इतर साहित्याला आग (Fire) लावली, तशी फिर्याद तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) दाखल झाली आहे. संजय गुलाब प्रभुणे (रा. श्रीरामनगर, कॉटेज कॉर्नर) यांनी ही फिर्याद दिली आहे. पोलिसांनी किरण बापूसाहेब महंत (पत्ता माहिती नाही) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

फिर्यादी व महंत यांच्यात आर्थिक व्यवहार झालेला आहे. या व्यवहाराचे पैसे फिर्यादी यांना महंत यांच्याकडून येणे बाकी आहे. रविवारी रात्री फिर्यादी कुटुंबासह घरात झोपलेले असताना महंत याने फिर्यादी यांची घराबाहेर उभी केलेली रिक्षा (Riksha), दुचाकी (Bike) व कपाट, कागदपत्रे आदी साहित्यांना आग लावली. फिर्यादी यांनी महंत याला आग (Fire) लावून पळून जाताना पाहिले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस (Topkhana Police) करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या