Thursday, April 25, 2024
Homeनाशिककर्ज मंजूर करून आर्थिक फसवणूक

कर्ज मंजूर करून आर्थिक फसवणूक

नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik

मोबाईल खरेदीसाठी परस्पर दुसऱ्या व्यक्तीची कागदपत्रे देऊन ५० हजार रुपयांचे प्रकरण मंजूर करून देऊन आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे .

- Advertisement -

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इजाज सय्यद व त्याचे इतर मित्र सुयश देवरे , शुभम् कातकाडे , अक्षय बागले व महेश गवळी यांनी सुधीर डोमन सिंग ( रा . संजीवनगर , चुंचाळे शिवार , अंबड लिंक रोड ) यांनी कर्जमंजुरीसाठी दिलेल्या कागदपत्रे , फोटो व त्यांचे जीओ कंपनीचे सिमकार्ड नंबरचा वापर करून त्यांच्या नावावर परस्पर मोबाईल खरेदीसाठी ५० हजार रुपयांचे कर्ज प्रकरण मंजूर करवून घेतले .

आलेल्या पैशांतून नवीन मोबाईल घेऊन तो मोबाईल तिसऱ्याच व्यक्तीला विकून आलेल्या पैशाचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास वपोनी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राकेश शेवाळे करीत आहेत .

- Advertisment -

ताज्या बातम्या