Friday, April 26, 2024
Homeनाशिकसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी आर्थिक योगदानास पुढे यावे : भुजबळ

संमेलनाच्या यशस्वीतेसाठी आर्थिक योगदानास पुढे यावे : भुजबळ

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास शासनाच्यावतीने दोन कोटींची मदत उपलब्ध झाली आहे. परंतु संमेलनास अजून निधीची आवश्यकता असल्याने नाशिकमधीन विविध संस्थांनी संमेलनात आपले आर्थिक योगदानासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथ‍ संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयातिल नियोजन भवन येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन निधी संकलन आढावा बैठकीत ते बोलत होते. भुजबळ म्हणाले, १६ वर्षाच्या कालावधीनंतर नाशिक शहरात ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. नाशिक शहर व जिल्ह्यासाठी हि अभिमानस्पद बाब आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेबरोबरच याचा लौकिक वाढविण्याची जबाबदारी प्रत्येक नाशिककराची आहे.

त्यामुळे शहरातील विविध संस्थांनी व नागरिकांनी आर्थिक योगदानासाठी पुढे येवून लोकसहभाग वाढवावा. तसेच शहरातील हॉटेल चालकांनी देशभरातून येणाऱ्या पाहुण्यांसाठी राहण्याची, नास्ता व जेवणाची सोय करावी, असे भुजबळ यांनी बैठकित सांगितले.

आर्थिक विकासाला चालना

साहित्य संमेलनाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. सर्व मराठी साहित्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असल्याने येणाऱ्या पाहुण्यांची संख्या दुप्पट होणार आहे. तीन दिवसीय साहित्य संमेलेनास देशातून व राज्यातून अनेक साहित्यिक,लेखक ,कवी व रसिक मंडळी हजेरी लावणार आहेत. नाशिक शहराला साहित्य परंपरेबरोबरच परंतु जिल्ह्यांत आता अनेक धार्मिक पर्यटन स्थळही विकसित झाली आहेत.संमेलनासाठी येणारा प्रत्येक माणूस नाशिक मध्ये आल्यानंतर पर्यटन करुनच जाणार आहे. त्यामुळे उद्योगधंदा पर्यटन वाढणार असून जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार असल्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.

‘बालसाहित्य’ मेळावा ठरणार आर्कषण

साहित्य समंलेनात सर्वच वयोगटातील लोकांचा सहभाग असणार आहे. या ठिकाणी बचतगटाच्या माध्यमातून ४०० स्टॉल्स उभारले जाणार असून याव्यतिरिक्त पर्यटन, चित्रकला, शिल्पकला, प्रकाशन कट्टा, कवीकट्टा यासाठी सुद्धा वेगवेगळ्या हॉल्सची उभारणी करणयात येणार आहे. कवीकट्टयात आपल्या कविता सादर करण्यसाठी आजपर्यंत १ ‍हजार ५३२ कविता प्राप्त झाल्या आहेत. संमेलनात बालगोपाळांसाठी ३ दिवसीय बालसाहित्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून यासाठी जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर उपस्थित रहाणार आहे. त्यामुळे संमेलनातील ‘बालसाहित्य’ मेळावा संमेलनाचे आर्कषण ठरणार आहे.

साहित्य संमेलनास यांनी दिली मदत

नाशिक सिटीझन फोरमचे अध्यक्ष तथा रामबंधु मसाले समुहाचे हेमंत राठी यांनी सारस्वत बँकेच्यावतीने सात लाख रुपये व राम बंधु मसाले समुहाकडून 3 लाख अशी एकूण 10 लाखाची मदत संमेलनासाठी जाहिर केली. तसेच संदिप फांउडेशने २०० व भुजबळ नॉलेज सिटी संस्थेने २०० पाहुण्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच हॉटेल सिटी प्राईड, हॉटेल सुर्या, हॉटेल हॉलीडे ईन, हॉटेल एमराल्ड पार्क यांनी देखील येणाऱ्या काही पाहुण्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या