Friday, April 26, 2024
Homeनाशिकलॉकडाऊनमुळे क्लासचालक हवालदिल

लॉकडाऊनमुळे क्लासचालक हवालदिल

देवगांव | Deogoan

कोरोनाचा पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून कॉम्पुटर क्लासेस बंद आहेत. यामुळे क्लास चालकांना आर्थिक फटका सहन करावा लागत असून विद्यार्थ्यांचेही नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

जिल्ह्यासह राज्यात अनेक खाजगी संस्था कॉम्प्युटर क्लासेस चालवतात. यामध्ये अनेक कोर्सेस, स्टडी सेंटरची सोया करण्यात येते. त्यामुळे कॉलेज, जॉब बरोबर इतर कोर्सेस करणारे विद्यार्थी, आदींची मोठी संख्या आहे. आणि यावर सर्व क्लासेस चालवले जातात. परंतु गेल्या वर्षभरा पासून क्लासेसवर शासनाने बंधने घातली. त्यामुळे विद्यार्थ्यांना या परीक्षा देता येत नाहीत. परिणामी क्लासचालकाना नुकसान सोसावे लागत आहे.

या क्लासेसमध्ये साधारणत: दरवर्षी लाखापेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेश घेत असतात. त्यातल्या त्यात मार्च, एप्रिल आणि मे या कालावधीत जास्त प्रवेश होत असतो. मार्च, एप्रिल आणि मे या कालावधीत होणाऱ्या प्रवेशातून वर्षभरातील एकूण उत्पन्नाच्या ७० ते ८० टक्के उत्पन्न या काळात क्लासचालकांना होत असते. त्याच्या जोरावरच वर्षभर हे क्लासेस सुरू असतात. मात्र मागील वर्षी आणि यावर्षी असं सलग दोन वर्ष मेगा बॅच न मिळाल्याने संगणक क्लासचालक हवालदिल झाले आहेत.

सध्या जागेचे भाडे, दुरुस्ती देखभाल यांचा खर्च, लाइट बिल आणि, कर्जाचे हप्ते असे एक ना अनेक खर्च चालूच आहेत. हे काही चुकले नाही. हे खर्चचालकांना आता परवडेनासे झाले आहेत. यापुढेही क्लास सुरू होण्याची शाश्वती नसल्याने बँकांचे हप्ते भरायचे कसे, कुटुंब निर्वाह कसा करायचा? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

– कुमार गोणके, संचालक, श्री शारदा संगणक सेंटर, खोडाळा

- Advertisment -

ताज्या बातम्या