होरपळलेल्या शिवमसाठी जैन ट्रस्टचे अर्थसहाय्य

jalgaon-digital
2 Min Read

धुळे Dhule। प्रतिनिधी

येथील जैन ट्रस्टतर्फे (Jain Trust) भाजलेल्या शिवमच्या (Shivam) उपचारासाठी (treatment) अडीच लाखांचे अर्थसाह्य (Financial assistance) करण्यात आले आहे.

दारिद्रय रेषेखालील व्यक्तींच्या शस्त्रक्रियांचा अथवा उपचारांचा आर्थिक भार पेलण्यासाठी शासनाने विविध योजना कार्यान्वित केलेल्या आहेत. परंतु अशा योजनांचा लाभ रूग्णाला विविध कारणास्तव घेता येत नाही. त्वरीत उपचारांची निकड, शासकीय सवलती पदरी पाडून घेण्यासाठी हवे असलेले मार्गदर्शन, विशिष्ट हॉस्पीटल किंवा ज्ञात डॉक्टरांवरील श्रद्धा, नातेवाईकांचा सल्ला असे अनेक अडसर त्याला शासकीय लाभापासून वंचित करतात. अशा अडीअडचणी जमेस धरून पुण्यातील समवेदना सारख्या सामाजिक संस्था त्यांच्यातर्फे त्यांना सक्रिय सहकार्य करतात.

सह्याद्री हॉस्पिटलसारखे नामांकित हॉस्पीटल्स त्यांच्या या उदात्त कार्यात सहभागी होतात. या पार्श्वभूमीवर समवेदना संस्थेचे (Sympathy Society) कार्यकारी अधिकारी अमर पवार यांनी 20 मे रोजी जैन ट्रस्टला शिवमच्या सह्याद्री हॉस्पीटलमधील उपचारासाठी (treatment) अर्थसहाय्यासाठी (Financial assistance) प्रस्ताव सादर केला.

पुणे जिल्ह्यातील खेमसेवाडी येथील दत्तात्रय खेमसे यांचा तीन वर्षांचा शिवम कुटुंबियांची नजर चुकवून स्वयंपाक घरात शिरला. त्याचा धक्का लागून पेटलेल्या चुलीवरील आमटीचे पातेले त्याच्या अंगावर सांडले गेले. 50 टक्के शरीर भाजले गेल्यामुळे हितचिंतकाच्या शिफारशीमुळे दत्तात्रय यांनी समवेदना कार्यालयाशी संपर्क साधला.

शिवमला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. श्री. खेमसे यांना दारिद्र्यापोटी मोठ्या रकमेची तरतूद करणे केवळ अशक्य होते. खेमसे कुटुंबियातर्फे अमर पवार यांनी आवश्यक ती कागदपत्रे स्व. रतिबाई मगनलाल जैन पब्लिक ट्रस्टला (Late. Ratibai Maganlal Jain Public Trust) उपलब्ध करून ट्रस्टकडून अनामत रक्कमेपोटी 2,50,000 पाठविण्याची विनंती केली. प्रा.डॉ.न.म. जैन यांनी विश्वस्तांशी त्वरीत संपर्क करून समवेदना संस्थेच्या खात्यात आरटीजीएस सुविधेद्वारा उपरोक्त रकमेचा भरणा केला. अशा संदर्भात ट्रस्ट केवळ निमित्तमात्र ठरतो. श्रेय खर्‍या अर्थाने जैन ट्रस्टच्या देणगीदारांकडे जाते. अशी भावना ट्रस्टचे प्रभारी कार्यकारी विश्वस्त प्रा.डॉ. संजीव जैन यांनी व्यक्त केली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *