Wednesday, April 24, 2024
Homeनगरअखेर कोकणगाव-मनोली रस्त्याच्या कामास सुरुवात

अखेर कोकणगाव-मनोली रस्त्याच्या कामास सुरुवात

कोकणगाव (वार्ताहर)

संगमनेर तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणार्‍या कोकणगाव-मनोली रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे. याबाबतचे वृत्त दै. सार्वमतमध्ये प्रसिद्ध झाले. या वृत्ताची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने कोकणगाव-मनोली रस्त्याचे रुंदीकरण व खडीकरण करुन खड्डे बुजविण्याच्या कामास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

गेली दोन वर्षापासून या रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत होती. छोटे-मोठे अपघात होत होते. रस्त्याच्या कडेने काटेरी झाडे वाढल्याने रस्ता अरुंद झाला होता. कोकणगावकडून मनोली, रहीमपूर, ओझर, उंबरीबाळापूर, आश्‍वी अशा गावांना जाणार्‍या या रस्त्याची खूपच दयनीय अवस्था झाली होती.

या रस्त्याबाबत दै. सार्वमतमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार संबंधीत रस्त्याचे रुंदीकरण, खडीकरण व खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरु केले आहे. सुरु झालेल्या कामामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या