Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रयुजीसीच्या निर्णयाविरोधात याचिका

युजीसीच्या निर्णयाविरोधात याचिका

पुणे | प्रतिनिधी | Pune

राज्यातील विद्यापीठांमधील पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात की नाही घ्याव्यात यावरून वाद सुरु आहे. या परीक्षा न घेण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. तर यु.जी.सीने परीक्षा घ्याव्यात असे निर्देश विद्यापीठांना दिले आहे. यूजीसीच्या गाईडलाईननुसार सप्टेंबर २०२०मध्ये अखेरच्या वर्षातील परीक्षा होऊ शकतात.

- Advertisement -

युवा सेना नेते आदित्य ठाकरे या अखेरच्या परीक्षा रद्द करण्याबाबत सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. कोरोनामुळे राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा रद्द करण्यात याव्यात यासाठी आदित्य ठाकरे सुप्रीम कोर्टात धाव घेत आहेत. सध्याची कोरोनाची corona स्थिती पाहता सर्व राज्यांना योग्य निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात यावा अशी मागणी आदित्य ठाकरेंची आहे.आता पुण्यातील विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

यु. जी. सी ने सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व राज्यांतील पदवी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंधर्भात परिपत्रक दिनांक ६-७-२०२० रोजी प्रकाशीत केले. कोरोना आजाराच्या वाढत्या परिणामामुळे सध्यपरिस्थितीमध्ये परीक्षा न घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने दिनांक १९-६-२०२० रोजी घेतला. वरील निर्णयामध्ये सुसूत्रता नसल्याने व अभ्यासक्रम पूर्ण न झाल्याने विध्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण होऊन मानसिक स्वास्थ्य खराब झाले आहे. सध्य परिस्थितीमध्ये परीक्षा घेणे हे विद्यार्थ्यांसह,शिक्षक,परीक्षक व सामान्य जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने संयुक्तिक ठरणार नाही.आपत्ती व्यवस्थान कायद्यानुसार महाराष्ट्र शासनाने घेतलेला निर्णय योग्य असून यु. जी.सी ने घेतलेला निर्णयामुळे मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असल्याचे याचिकेत नमूद केले आहे. आता पुण्यातील विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

जास्त वेळ मास्क वापरल्यामुळे विध्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम व त्यातून निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्या व कोरोना संसर्गाचा धोका इ. उधभावणारऱ्या समस्यांमुळे पुण्यातील विधी शाखेचे विध्यार्थी कृष्णा वाघमारे, किरण साळुंके, प्रियेश सोनवणे, मंगेश नढे, ज्ञानेश्वर लामखेडे, अजित घाडगे, पीटर स्मिथ आदी विध्यार्थ्यांनी ऍड. किशोर लांबट यांच्या मार्फत सर्वोच्च न्यायालयात याचिका दिनांक २२-०७-२०२० रोजी दाखल केली असून सदर याचिका तात्काळ सुनावणीसाठी घेण्याची विनंती केली आहे. विद्यार्थी प्रश्नाबाबत युजीसीच्या निर्णयाविरोधात किशोर लांबट हे सर्वोच्च न्यायालयात याचिका कर्त्यांची बाजू मांडत असून त्यांना पुण्यातील ऍड. नितीन कासीलवाल व ऍड पल्लवी भट हे सहकार्य करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या