Thursday, April 25, 2024
Homeनाशिक७ ऑक्टोबरपासून ‘मुक्त’ च्या अंतिम वर्ष परीक्षा

७ ऑक्टोबरपासून ‘मुक्त’ च्या अंतिम वर्ष परीक्षा

नाशिक | Nashik

गंगापूर येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ७ ऑक्टोबर पासून सुरू हाेत आहेत.

- Advertisement -

ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असून विद्यापीठाकडून परीक्षेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केले आहे.

मात्र सध्याच्या स्थितीत प्रसिध्द केलेल्या वेळापत्रकातील अभ्यासक्रमाच्याच परीक्षा होणार असुन त्याव्यतिरिक्त अभ्यासक्रमाच्या परीक्षांसंदर्भात यापरीक्षेनंतर स्वतंत्ररीत्या कळविण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

परीक्षेच्या कालावधीत परीक्षेसंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी अभ्यासकेंद्रांनी प्रति सत्र एका व्यक्तींची नियुक्ती केलेली आहे. त्याचा मोबाईल नंबर संबंधित अभ्यासकेंद्रावरून विद्यार्थ्यांनी घेऊन

परीक्षेसंदर्भात अडचणींबाबत संपर्क करण्याचे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा सुरू झाल्या असून यात राज्यातील ११५ परीक्षा केंद्रांत २५ ते ३१ ऑगस्ट दरम्यान पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेण्यात आल्या आहेत. तर पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा २६ ऑक्टोबर ते ०९ नोव्हेंबर व २१ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर अशा दोन टपप्यांमध्ये होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या