Friday, April 26, 2024
Homeनाशिकसिन्नर नगरपरिषदेची अंतिम प्रभागरचना जाहीर

सिन्नर नगरपरिषदेची अंतिम प्रभागरचना जाहीर

सिन्नर । वार्ताहर Sinnar

सिन्नर ( Sinnar ) नगरपालिकेची मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकार्‍यांच्या स्वाक्षरीने तयार केलेली प्रारूप प्रभागरचनाच निवडणूक आयोगाने ( Election Commission)अंतिम केल्याने हरकती घेणार्‍यांचा हिरमोडझाला आहे.

- Advertisement -

नवीन प्रभागरचनेनुसार सिन्नर शहरात आता दोन नगरसेवकांचा एक प्रभाग याप्रमाणे 15 प्रभाग तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार आता शहरातून 30 नगरसेवक निवडून जाणार आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी 16 हा जादुई आकडा राजकीय पक्षांना गाठावा लागणार आहे. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी विशिष्ट व्यक्तींच्या राजकीय फायद्यासाठी ही प्रभागरचना बनवण्यात आल्याचा आरोप करत हरकत घेतली होती.

वाजे गटाच्या केवळ चार हरकती असून आ. माणिकराव कोकाटे गटाकडून तब्बल 16 हरकती घेण्यात आल्या होत्या. प्रभाग 9 वरती दत्तात्रय तुकाराम हांडे, कृष्णानंद भाऊसाहेब कासार आणि इतर चार, प्रभाग 6 वर दर्शन सुरेश कासट, प्रशांत सुनील सोनवणे, प्रभाग 8 वर हर्षद प्रभाकर देशमुख, राकेश कमानकर, अजित पहिलवान, प्रभाग 1 वर गणेश खर्जे व इतर 41, प्रभाग 3 वर सोनाली गवळी, प्रभाग 10 वर प्रदीप साळुंखे, शरद गोळे, प्रभाग 12 वर शैलेश नाईक, प्रभाग 4 वर हेमंत वाजे, प्रभाग 5 वर दशरथ कुरणे तर संपूर्ण प्रभागरचनेवर किरण मुत्रक आणि माजी आमदार वाजे यांनी हरकत घेतली होती. या सर्व हरकती फेटाळत निवडणूक आयोगाने प्रारुप प्रभागरचनाच अंतिम केल्याने हरकती घेणार्‍यांचा हिरमोड झाला.

असे आहेत प्रभाग

प्रभाग क्र. 1 (भैरवनाथ सोसायटी, मापारवाडी, खर्जेमळा, तळवाडी),

प्रभाग क्र. 2 (कानडी मळा, विजयनगर, विद्यावर्धिनी नगर),

प्रभाग क्र. 3 (उज्वल नगर, गणेशनगर, शंकरनगर, मुक्तेश्वर नगर),

प्रभाग क्र. 4 (आंबेडकर नगर व सभोवतालचा परिसर),

प्रभाग क्र. 5 (परीट गल्ली, सुतार गल्ली, फुले शाळा),

प्रभाग क्र. 6 (नगरपरिषद, तानाजी चौक. न. प. नाट्यगृह),

प्रभाग क्र. 7 (जोशीवाडी, माकडवाडी, गोंदेश्वर मंदिर, पंचायत समिती कार्यालय),

प्रभाग क्र. 8 (गंगावेस, लाल चौक),

प्रभाग क्र. 9 (साई दत्त नगर, देवी रोड),

प्रभाग क्र. 10 (उद्योग भवन, देशमुख नगर),

प्रभाग क्र. 11 (जीएमडी कॉलेज, लक्ष्मीनारायण लॉन्स),

प्रभाग क्र. 12 (मधुर मिठास, राम नगरी, हॉटेल पंचवटी),

प्रभाग क्र. 13 (वरंदळ मळा, लोहारकर हॉस्पिटल, नवजीवन शाळा),

प्रभाग क्र. 14 (पवार शाळा, ऋतुरंग पार्क), प्रभाग क्र. 15 (संगमनेर नाका, डुबेर नाका, परमसाई हॉस्पिटल)

- Advertisment -

ताज्या बातम्या