अखेर घोषणा : १३ जून पासून सुरत भुसावळ एक्सप्रेस

jalgaon-digital
4 Min Read

भुसावळ / नंदुरबार (BHUSAWAL) प्रतिनिधी –

कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढल्यानंतर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन नंतर येथून चालणारी गाडी क्र. ५९०१३/५९०१४ सुरत- भुसावळ पॅसेंजर (Surat- Bhusawal Passenger) बंद करण्यात आली होती. सध्या निर्बंध उठविण्यात आल्यानंतर अनेक गाड्या सुरू करण्यात आल्या मात्र सुरत पॅसेंजर सुरू करण्यात आली नव्हती. या मागणीनंतर सदर गाडी सुरु करण्यात आली असून तीला एक्सप्रेसचा दर्जा देण्यात आल्याने या गाडीच्या क्रमांकात बदल (Change of vehicle number) करण्यात आली असून ही गाडी आता १९०५/१९००६ सुरत भुसावळ एक्सप्रेस (Surat Bhusawal Express) अशी झाली आहे. अखेर ही गाडी आता १३ जून पासून पुर्ववत कार्यरत (Working) होणार असल्याचे वेस्टर्न रेल्वेने घोषित केले आहे.

दरम्यान, गाडी क्र. १९००५/१९००६ सुरत भुसावळ एक्सप्रेस (Surat Bhusawal Express) ही ८ व ९ जून रोजी नियमित सुरु होणार होती. याबाबत मध्य रेल्वेने ६ जून रोजी नोटीफिकेशन जारी केले होते. मात्र वेस्टर्न रेल्वेने ७ जून रोजी जारी करण्यात आलेल्या ट्वीटवरुन ही गाडी अद्याप सुरू करण्यात आली नसल्याने जाहीर केले होते. त्यामुळे वेस्टर्न व मध्य रेल्वेतील (Western and Central Railway) यांच्यामधील निर्णय वेगवेळे असल्याचे समोर आले होते. मात्र वेस्टर्न रेल्वेने १० जून रोजी सायंकाळी ५.०१ वाजता जारी करण्यात आलेल्या ट्विटमध्ये (Tweet) गाडी क्र. १९००५/ १९००६ सुरत- भुसावळ एक्सप्रेस ही गाडी दि. १३ जून पासून पर्ववत सुरू करण्यात येणार असल्याचे घोषित (Final announcement) केले आहे.
पूर्वीच्या गाडी क्र. ५९०१३/५९०१४ सुरत -भुसावळ या गाडीला एक्सप्रेसचा दर्जा देण्यात आल्यामुळे या गाडीच्या क्रमांकात बदल करण्यात आला असून आत ही गाडी १९००५/१९००६ सुरत भुसावळ एक्सप्रेस या नावाने ओळखली जाणार आहे.

अडीच वर्षानंतर थांबणार गैरसोय
देशात कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून मार्च २०२० पासून रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या त्यानंतर रेल्वेकडून विशेष आरक्षित गाड्या सुरु करण्यात आल्या होत्या मात्र पॅसेंजर गाड्या बंद असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत होते. भुसावळ येथून गेल्या काही महिन्यापूर्वी पॅसेंजर गाड्यांऐवजी मेमू गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. त्यात मात्र सुरत-भुसावळ पॅसेंजर बंदच होती. मात्र आता रेल्वेने सुरत-भुसावळ करण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.

मात्र मध्य रेल्वे वेस्टर्न रेल्वेच्या दोन सूचनांमुळे या गाडीच्या सुरू होणे किंवा बंद याबाबत संभ्रम निर्माण झाला असून प्रवाशांना दिलासा कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गाडी क्रमांक १९००५ सुरत-भुसावळ एक्सप्रेस ही गाडी ८ जून रोजी रात्री ११.१० वाजता सुरत स्थानकातून सुटेन, तर दुसर्‍या दिवशी ही गाडी सकाळी ७.५५ वाजता भुसावळ स्थानकात पोहोचणार आहे. तर गाडी क्रमांक १९००६ भुसावळ-सुरत पॅसेंजर ९ जूनपासून सायंकाळी ७.३० वाजता भुसावळ रेल्वे स्थानकातून सुटून दुसर्या दिवशी पहाटे ५.१५ वाजता सुरत स्थानकात पोहोचणार आहे.
सुरतहून रात्री ११.१० वाजता सुटणार एक्सप्रेस ही गाडी ८ जून रोजी रात्री ११.१० वाजता सुरत स्थानकातून सुटेल. त्यानंतर उधना ११.२०, बारडोली ११.५८, व्यारा मध्यरात्री १२.३१, नंदुरबार २.४०, दोंडाईचा ३.३०, शिंदखेडा ३.५९, नरडाणा ४.१८, अमळनेर ५.३, धरणगाव ५.४७, पाळधी ६.४०, जळगाव ७.१०, भुसावळ ७.५५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक १९००६ भुसावळ-सुरत पॅसेंजर ही गाडी ९ जूनपासून सायंकाळी ७.३५ वाजता भुसावळ रेल्वे स्थानकातून सुटेन. त्यानंतर जळगाव येथे रात्री ८.१०, पाळधी ८.३०, धरणगाव ८.५९, अमळनेर ९.३३, नरडाणा १०.१६, शिंदखेडा १०.५०, दोंडाईचा ११.१८, नंदुरबार १२.२५, व्यारा २.३१, बारडोली ३.४३, उधना ४.३५, सुरत पहाटे ५.१५ वाजता पोहोचेल.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *