Thursday, April 25, 2024
Homeनगरपैसे देऊन लग्न लावून आणलेल्या नवरीचा नवरदेवाच्या घरून पोबारा

पैसे देऊन लग्न लावून आणलेल्या नवरीचा नवरदेवाच्या घरून पोबारा

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

लग्न झाले अन् तेराव्या दिवशी नवरीने नवरदेवाच्या घरातून आपल्या सामानासह पोबारा केला. लग्न जमविण्यासाठी दीड लाख दिले आणि नवरीने पोबारा केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जळगाव जिल्ह्यातील या नवरदेवाने नवरीसह लग्न जमावणार्‍या चौघांवर फसवणुकीचा गुन्हा राहाता पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून या प्रकरणात एका महिलेस राहाता पोलिसांनी अटकही केली आहे.

- Advertisement -

कृष्णराव वाघ याचे लग्न जमत नसल्याने त्याने त्याची चुलत मावशी आशाबाई रघुनाथ माळी रा. चाळीसगाव हिला मुलगी बघण्यास सांगितले. आशाबाई माळी हिने राहाता तालुक्यातील साकुरी येथील मंगल अंकुश पेटारे रा. गोदावरी वसाहत, साकुरी ही बाई लग्न जमावण्याचे काम करते. तसेच ते सर्व प्रकारच्या सर्व समाजातील लोकांना मुली दाखवते तिचा तो व्यवसाय असून त्या बदल्यात तिला पैसे द्यावे लागतील असे सांगितले. फिर्यादी कृष्णराव वाघ त्यावर म्हणाले, लग्न जमवत असतील आपण त्यांच्या म्हणणण्याप्रमाणे पैसे देऊन टाकू.

कृष्णराव वाघ यांची चुलत मावशी आशाबाई माळी या काही कामधंद्यामुळे शिर्डी येथे दोन वर्षे राहिल्याने तिची व मंगल पेटारे यांची चांगली ओळख होती. तसेच ती लग्नासाठी मुली पाहून देते हे ही आशाबाई हिस माहिती होते. त्यामुळे आशाबाई माळी हिने मंगल पेटारे हिला फोन करून विचारले की माझ्या चुलत बहिणीचा मुलगा कृष्णराव सुकलाल वाघ याचेसाठी एखादी मुलगी मिळेल का, त्यावर मंगल पेटारे म्हणाल्या, मुलगी शोधल्यानंतर व मुलगी लग्नासाठी तयार झाल्यानंतर मी तुम्हाला फोन करीन. त्यानंतर तिने आशाबाई हिला फोन करून तुझ्या बहिणीच्या मुलाला कृष्णराव याचेसाठी मुलगी पाहिली आहे. तुम्ही कधी येता, असा फोन आल्याने कृष्णरावची मावशी आशाबाई हिने कृष्णरावला फोन आल्याचे सांगितले. त्यानंतर कृष्णराव त्यांची मावशी आशाबाई, व कृष्णरावची आई मिराबाई सुकलाल वाघ असे तिघे भाड्याची गाडी करून दि. 18 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री 9.30 वाजता मंगल पेटारे यांच्या घरी आले. मंगल पेटारे यांनी कृष्णरावला मुलगी दाखवली. त्या मुलीचे नाव आरती किरण मोरे (वय 25) रा. संगमनेर असे त्या मुलीने नाव सांगितले. मुलीला पसंद केले. मुलीनेही कृष्णरावला पसंद केले. लग्न करायचे असेल तर मुलीचा मामा केशव रामजी वाघ याला दीड लाख रुपये रोख द्यावे लागतील असे मंगल पेटारे यांनी सांगताच त्यास कृष्णराव याने संमती दर्शविली.

ठरल्याप्रमाणे 20 नोव्हेंबर रोजी नवरदेव कृष्णराव यांचे गावी खेडगाव ता. चाळीसगाव येथे विवाह करण्याचे ठरले. त्याप्रमाणे या दिवशी सकाळी 10 वाजता मुलगी आरती किरण मोरे, मंगल अंकुश पेटारे, बनावट मंगल अंकुश पेटारेचा नवरा अंकुश रामराव पेटारे, मंगल पेटारेचा बनावट भाऊ केशव रामजी वाघ असे आले. ठरल्याप्रमाणे दुपारी 3 वाजता हिंदू धर्म पध्दतीने आरती किरण मोरे हिच्याशी कृष्णरावचे लग्न लावून दिले. यावेळी 1 लाख 50 हजार रुपये आपण मंगल अंकुश पेटारे हिला मावशी आशाबाई रघुनाथ माळी हिच्या समक्ष याच दिवशी सायंकाळी 5 वाजता दिले.

त्यानंतर पत्नी आरती किरण मोरे ही नवरदेवाच्या घरी लग्न झाल्यापासून 3 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 2.30 वाजता नवरदेवाच्या वडिलांचा दहाव्याचा कार्यक्रमाच्या गडबडीत असताना नवरी आरती मोरे ही तिचे सर्व सामान घेऊन घरातून गुपचूप निघून गेली. तिच्याशी फिर्यादीचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होईना, याची कल्पना मावशी आशाबाई माळी हिस पत्नी आरती घरातून निघून गेल्याचे कृष्णरावने सांगितले. व माझी फसवणूक झाली की काय अशी शंका त्यास येऊ लागली.

मावशी आशाबाई माळी हिने आशाबाई पेटारे हिच्याशी साकुरी येथे संपर्क केला. त्यावर मंगलाबाई पेटारे आशाबाईला म्हणाल्या, पोरगी गेली तर जाऊ द्या, आता मी तरी काय करणार, तुमचे पैसे देण्याची व्यवस्था करते. त्यानंतर वेळोवेळी फोनवर मंगल अंकुश पेटारे हिला भेटून वेळोवेळी पैशाची मागणी केली असता मंगल पेटारे हिने 15 डिसेंबर 2021 रोजी फिर्यादी कृष्णराव च्या स्टेट बँकेच्या खात्यात 30 हजार रुपये ट्रान्सफर केले. उर्वरित 1 लाख 20 हजार रुपये मागण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला परंतु आता राहिलेले पैसे मिळणार नाही. माझे विरुध्द पोलिसांत तक्रार दाखल करू शकता, तू जर पैसे मागायला आला तर तुला जिवे ठार मारील अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी कृष्णराव सुकलाल वाघ (वय 34) रा. खेडगाव, ता. चाळीसगाव, जिल्हा जळगाव यांनी राहाता पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी राहाता पोलीस ठाण्यात गु. र. नंबर 45/2022 प्रमाणे आरती किरण मोरे (रा. संगमनेर), मंगल अंकुश पेटारे (साकुरी), बनावट मंगल अंकुश पेटारेचा नवरा अंकुश रामराव पेटारे, मंगल पेटारेचा बनावट भाऊ केशव रामजी वाघ यांच्याविरुध्द भादंवि कलम 420, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील लग्न जमविणार्‍या मंगल अंकुश पेटारे यांना राहाता पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सतीश आवारे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या