Thursday, May 9, 2024
Homeनाशिकलेखानगर परिसरात सापडल्या वाळूने भरलेल्या नऊ ट्रक, पहा पुढे काय झाले

लेखानगर परिसरात सापडल्या वाळूने भरलेल्या नऊ ट्रक, पहा पुढे काय झाले

इंदिरानगर | Indiranagar

अहमदनगर (Ahamdanagar) येथील पथकाने केलेल्या कारवाईत लेखानगर (Lekhanagar) येथील वाळूने भरलेले नऊ ट्रक ताब्यात घेऊन संबंधित ट्रक मालकांवर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Indiranagar Police Station) करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार (दि.१६) रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास अहमदनगर येथील जिल्हा गौण खनिज अधिकारी (District Minor Mineral Officer) यांच्या भरारी पथकाने लेखानगर समोरील मोकळ्या जागेत नऊ वाळूने भरलेला ट्रक उभ्या असलेल्या दिसून आल्या.

तातडीने भरारी पथकाने (Bharari Squad) कळवले असता नाशिकचे तहसीलदार अनिल दौंड व मंडळ अधिकारी प्रशांत कांबळे, तलाठी वसंत धुमसे देखील दाखल झाले भरारी पथकाने एकूण नऊ ट्रक व त्यात भरलेली दीड ब्रास

वाळू मंडलाधिकारी प्रशांत कांबळे पावती करून यांच्या ताब्यात दिल्या.

तसेच सदर ट्रक मालकांना आपले म्हणणे मांडण्यासाठी तहसील कार्यालयात (Tahsil Office) समक्ष हजर राहण्याचे सांगण्यात आले होते, परंतु संबंधित मालकांनी वाळू कुठून आणली आहे व त्याचा विक्री परवाना बाबत विचारणा केली असता त्याकडे कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाही.

तसेच विक्री परवाना आढळून आला नाही म्हणून नऊ ट्रक मालकांवर गौण खजिना चोरीप्रकरणी संजय कापडणीस तलाठी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Case Filed) करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या