खोटा गुन्हा दाखल करून बदनामी केल्याप्रकरणी रुई सरपंचाविरुध्द गुन्हा दाखल

jalgaon-digital
1 Min Read

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

वृत्तपत्र वर्धापनदिन अंकात रुई ग्रामपंचायतीची शुभेच्छा जाहिरात दिली असता त्याचे पेमेंट मागितले असता देण्यास टाळाटाळ केली. त्याचदरम्यान रुई गावातील खराब रस्त्याची बातमी छापली असता त्याचा राग मनात धरून खोटा गुन्हा दाखल करून बदनामी केल्याप्रकरणी रुई ग्रामपंचायतीचे सरपंचाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिर्डी येथील वृत्तपत्राच्या वर्धापनदिनाच्या अंकात रुई ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप बाबासाहेब वाबळे यांनी रुई ग्रामपंचायतीची 6 हजार रुपयांची शुभेच्छा जाहिरात दिली असता ती प्रसिध्द केली. त्याचे पेमेंट प्रत्यक्ष भेटून व मोबाईलद्वारे बोलून मागितले असता ते देण्यास टाळाटाळ केली. त्याचदरम्यान दैनिकात रुई गावातील खराब रस्त्याची बातमी छापली असता. त्याचा राग मनात धरून संदीप बाबासाहेब वाबळे यांनी जितेश मनोहर लोकचंदानी यांचेविरुध्द गुन्हा रजि. 157/2021 प्रमाणे भादंवि कलम 385, 501, 502, 504 अन्वये खोटा गुन्हा दाखल करुन दैनंदिन कामकाजाचे नुकसान होऊन बदनामी केली.

याप्रकरणी जितेश मनोहर लोकचंदानी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजि. नं. 251/2021 प्रमाणे संदिप बाबासाहेब वाबळे यांचेविरुध्द भादंवि कलम 211, 499, 500, 182 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक श्री. गडाख करत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *