Thursday, April 25, 2024
Homeनंदुरबारधडगांव येथे दोन गटात हाणामारी

धडगांव येथे दोन गटात हाणामारी

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

धडगांव शहरात किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाली असून परस्परविरोधी आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगाव येथे शिवीगाळ केल्याचा जाब विचारायला गेलेल्या भारती शिंपी यांच्यासह यांचा पती व मुलगा यांना हाताबुक्यांनी व काठीने चौघांनी मारहाण केली.

याप्रकरणी भारती जगनाथ शिंपी रा.वडफळया (ता.धडगांव) यांच्या फिर्यादीवरून अजय जिर्‍या वळवी, रविंद्र जिर्‍या वळवी, सविता जंगल्या वळवी, जंगला पिर्‍या ठाकरे सर्व रा. वडफळया (ता.धडगांव) यांच्या विरूध्द धडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र जाधव करीत आहेत.

तर दुसर्‍या घटनेत बहिणीसोबत कुरापती काढून भांडण का करतात याचा जाब विचारणार्‍या अजय जिर्‍या वळवी व त्याचा लहान भावाला चौघांनी लोखंडी पाईपने मारहाण केली व दगडाने डोक्यावर मारून दुखापत केल्याप्रकरणी अजय जिर्‍या वळवी यांच्या फिर्यादीवरून भारतीबाई जगनाथ शिंपी, कृष्णकांत जगनाथ शिंदे, मयुर जगनाथ शिंपी यांच्या विरूध्द धडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोना दिलीप वसावे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या