Thursday, April 25, 2024
Homeनगरइमामपूर येथे दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी

इमामपूर येथे दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी

अहमदनगर (प्रतिनिधी) – इमामपुर (ता. नगर) येथे दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी झाली असून या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल झाल्या आहेत.

भगवान बाजीराव बोठे (वय 26 रा. इमामपूर) यांनी पहिली फिर्याद दिली आहे. भगवान यांची आई इमामपूर शिवारातील शेतामध्ये बांधाच्या बाभळी तोडत असताना तुकाराम यशवंत टिमकरे, उदय रामदास टिमकरे, रामदास तुकाराम टिमकरे यांनी शिवीगाळ केली. याबाबत भगवान बोठे हॉटेल हनुमान येथे विचारण्यासाठी गेले असता वरील तिघांनी लोखंडी गज, स्टंप व दांडक्याने उजव्या खांद्यावर पाठीत व हातावर मारहाण करून जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

- Advertisement -

तर दुसरी फिर्याद रामदास तुकाराम टिमकरे (वय 42 रा. इमामपूर) यांनी दिली आहे. यात टिमकरे यांनी म्हटले आहे की, वडील इमामपूर शिवारातील नगर- औरंगाबाद रोडवर असलेल्या हॉटेल हनुमान येथे असताना माझ्या वडिलांना तुम्ही हॉटेलची जागा सोडून द्या, ती आमची आहे असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच भगवान बोठे याने कोयत्याने उजव्या कानाच्या खाली खांद्यावर मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. यावरून बाजीराव भानुदास बोठे, बबन बाजीराव बोठे, भगवान बाजीराव बोठे, मिठु बाजीराव बोठे यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या