Saturday, April 27, 2024
Homeनगरपेट्रोल कमी दिल्याच्या संशयावरून हाणामारी

पेट्रोल कमी दिल्याच्या संशयावरून हाणामारी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कमी पेट्रोल दिल्याच्या संशयावरून औरंगाबाद रस्त्यावरील एका पेट्रोल पंपावर तुफान हाणामारी झाली. रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर पोलिसही दाखल झाले. मात्र, गुन्हा दाखल न करता परस्पर वाद मिटवून विषयावर पडदा घालण्यात आला.

- Advertisement -

सदर पेट्रोल पंपावर एका व्यक्तीने 100 रूपयांचे पेट्रोल दुचाकीमध्ये भरले. पेट्रोल कमी असल्याचा संशय दुचाकीस्वाराने व्यक्त केला. त्यावर पेट्रोल पंपावरील कर्मचार्‍याने गाडी बाजूला घेऊन पेट्रोल चेक करून घ्या, असे सांगितले. मात्र, दुचाकीस्वाराने कमी पेट्रोल दिल्याचा आरोप केला. त्यामुळे चिडलेल्या कर्मचार्‍याची व दुचाकीस्वाराची वादावादी झाली. त्याचे पर्यावसन दोघांच्या हाणामारीत झाले. त्यानंतर पंपावरील इतर कर्मचार्‍यांनीही संबंधित दुचाकीस्वाराला चोप दिला. पंपावरील इतर व्यक्तींनी मध्यस्ती करून हा वाद मिटवला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलीस ठाण्यापर्यंत वाद गेला होता. मात्र, फिर्याद न घेता पोलीस ठाण्याच्या बाहेरच हा वाद मिटवून त्यावर पडदा घालण्यात आला. मात्र, या घटनेची जोरदार चर्चा परिसरात सुरू होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या