Sunday, April 28, 2024
Homeनगरबोल्हेगावात दोन गटात हाणामारी

बोल्हेगावात दोन गटात हाणामारी

अहमदनगर (प्रतिनिधी) – बोल्हेगावच्या मराठी शाळेजवळ दोन गटात हाणामारीची घटना सोमवारी सकाळी घडली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात परपस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत.

राजेंद्र बबन पोटे (वय 30 रा. सातवड ता. पाथर्डी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रवीण यशवंत राऊत, सचिन यशवंत राऊत (दोघे रा. शिंदे मळा, नगर) व दोन अनोळखी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मित्राच्या घरी बोल्हेगाव येथे जात असताना प्रवीण राऊत, सचिन राऊत व दोन अनोळखी इसमांनी मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. गळ्यातील सोन्याची चैन व अंगठी काढून घेतली.

- Advertisement -

दुसरी फिर्याद प्रवीण यशवंत राऊत यांनी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून राजेंद्र बबन पोटे व प्रसाद पोपट कानडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राऊत यांच्या फिर्यादीत म्हटले आहे की, पोटे व कानडे यांनी मला बोल्हेगाव मराठी शाळेजवळ आडवून, शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात आमच्या विरोधात चोरीची केस का दिली, असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एक तोळा वजनाची सोन्याची चैन काढून घेत गाडीचे नुकसान केले आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या