Saturday, April 27, 2024
Homeनाशिक‘आरटीई’ च्या प्रवेशाला पाचव्यांदा मुदतवाढ

‘आरटीई’ च्या प्रवेशाला पाचव्यांदा मुदतवाढ

नाशिक | Nashik

शिक्षण हक्क कायदा अर्थात आरटीईअंतर्गत राबवण्यात येणार्‍या प्रवेश प्रक्रियेच्या लॉटरी पाठोपाठ प्रतीक्षा यादीतील प्रवेशाला पालकांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यापार्श्वभूमीवर अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी आरटीई प्रवेशाला पाचव्यांदा मुदतवाढ देण्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढवली.

- Advertisement -

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार प्राथमिक शिक्षण संचालनालयाद्वारे खासगी शाळांमधील २५ टक्के जागांवर आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. यंदा राज्यातील ९ हजार ३३१ खासगी शाळांमध्ये पंचवीस टक्‍के राखीव जागांर्तगत १ लाख १५ हजार ४७७ जागा उपलब्ध होत्या.

लॉटरीमध्ये राज्यभरातून पहिल्या फेरीमध्ये निवड झालेल्या १ लाख ९२६ विद्यार्थ्यांपैकी ६८ हजार २८३ विद्यार्थ्यानी प्रवेश घेतले होते. त्यानंतर प्रतिक्षा यादीच्या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला होता. प्रतिक्षा यादीकडेही पालकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. (दि.२२) सायंकाळपर्यंत ८४ हजार ८५६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. तर ३० हजार ६२१ जागा अद्यापही रिक्त आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यात ३ हजार ६८४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहे.

दरम्यान, शाळांमध्ये शिल्लक राहिलेल्या रिक्त जागांनुसार पालकांना मेसेजद्वारे प्रवेशाचा दिनांक कळवण्यात येत आहे. परंतु पालकांनी फक्त मेसेजवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवर प्रवेशाची तारीख या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक प्रवेश घेण्याचा दिनांक पाहावा, अशा सूचनाही शिक्षण विभागाकडून दिल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या