Friday, April 26, 2024
Homeनाशिकजिल्ह्यात पंधरा करोना उपचार केंद्रे बंद

जिल्ह्यात पंधरा करोना उपचार केंद्रे बंद

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात करोना रुग्णांची ( Corona Patients ) संख्या शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही मोठया प्रमाणात कमी झाली आहे. करोनाचा प्रभाव ओसरला असल्याने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ( ZP Health Dept )जिल्ह्यातील सर्व 15 तालुक्यांत सुरू केलेली 15 करोना उपचार केंद्रे ( Covid care Centers ) बंद केली आहेत. डॉक्टर व सेवकांही माघारी बोलावण्यात आले आहे.

- Advertisement -

या सर्व करोना उपचार केंद्रांमध्ये रुग्णांवर उपचारासाठी ठेवलेले साहित्यदेखील ताब्यात घेऊन ते पुन्हा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रवाना करण्यात आले आहे. महिनाभरापासून करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने कमी होत आहे. असे असले तरी करोना अजूनही पूर्णपणे नष्ट झालेला नाही. रुग्णसंख्येत मात्र दिवसागणिक करोना रुग्ण संख्येत लक्षणीय घट होत आहे.

जिल्ह्यात पहिल्या व दुसर्‍या लाटेत रुग्णांवर उपचारासाठी सुरू केलेली पाचशेहून अधिक करोना उपचार रुग्णांच्या संख्येनुसार कमी करण्यात येत आहेत. करोनाच्या तिसर्‍या लाटेत प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयी सुरू करण्यात आलेली 15 करोना केंद्रे आता बंद करण्यात आली आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 86 रूग्ण आढळले असून त्यांच्यात करोनाची सूक्ष्म लक्षणे आढळून आल्याने त्यांच्या तपासणीनंतर गृह विलगीकरणात त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून उपचार करण्यात येत आहेत.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सुरू केलेले करोना उपचार केंद्रे प्रामुख्याने आश्रमशाळा, वसतिगृह आदी ठिकाणी होती. त्यात तात्पुरत्या स्वरूपात आरोग्य विभागाने कोविड सेंटरच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या होत्या. डॉक्टर व सेवकांही माघारी बोलावण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल पाटील यांनी दिली.

साहित्याचा पुढेही उपयोग

करोनाचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य विभागाने केलेली साहित्य खरेदी यापुढेही आरोग्य क्षेत्रासाठी उपयोगी ठरणार आहे. त्याते खाटा, औषधे, गोळ्या, ऑक्सिजन आदी साहित्याचा समावेश आहे. सर्व साहित्य यापुढेही कामी येणार असल्याने त्यांचे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात वाटप करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या