Wednesday, April 24, 2024
Homeजळगावबामनोद येथे भीषण आग ; साडेसहा लाखाचे नुकसान

बामनोद येथे भीषण आग ; साडेसहा लाखाचे नुकसान

यावल – प्रतिनिधी Yaval

बामनोद ता.यावल येथे दि.31 जानेवारी सोमवार रोजी भीषण आग लागली. ही घटना आज सकाळी १० वा घडली, यात पंकज हिरामण भंगाळे यांच्या खळ्याला आग लागली त्यात सुमारे ६ लाख 64 हजार रुपयाचे नुकसान झाले असून २ गुरे मृत्यू झाल्याचे आढळून आले.

- Advertisement -

यात क्रेसिंग पाईप एक लाख 80 हजार रुपये किमतीचे दोन इंची पाईप 12 हजार रुपये किमतीचे 3 इंची पाईप 18 हजार रुपये किमतीचे ठिबक नळ्या 40 हजार रुपये किमतीचे शेती अवजारे रू.85000 किमतीचे गुरांचा चारा 35000 रुपये तसेच सरपण एकवीस हजार रुपये पत्राचे शेड अडीच लाख रुपये धान रू.3000 व वासरी व एक व गार वीस हजार रुपये किमतीचे दोन जनावरे जळून खाक झाले असून अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.

घटनास्थळी सर्कल बबिता चौधरी, प्रभारी तलाठी भारत वानखेडे यांनी पंचनामा करून फैजपूर पो.स्टे.पो.नी.आखेगावकर यांचे सहस्टोफने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला. यात गावातील सर्व नागरिकांनी आग विझविण्यात प्रयत्न केले. आग विझवण्यासाठी भुसावळ नगरपालिका फैजपूर नगरपालिका व सावदा नगरपालिका यांचे अग्निशामक चार बंब मागवण्यात आली होती.

प्रमोद बोरोले गोकुळ लोखंडे कल्पेश महाजन भीमा झोपे पवन महाजन जीवन बोरोले अरविंद झोपे, तंटामुक्ती अध्यक्ष गोपाल भालेराव यांनी सहकार्य केले. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. फैजपूर सावदा भुसावळ नगरपरिषदेचे चार अग्निशमन बंब घटनास्थळी आग विझवण्यासाठी तात्काळ पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला.

- Advertisment -

ताज्या बातम्या