Thursday, April 25, 2024
Homeनगरसर्व सण-उत्सव एकत्रितपणे साजरे करा - स्वाती भोर

सर्व सण-उत्सव एकत्रितपणे साजरे करा – स्वाती भोर

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

शहरात मागील काळात काही चुकीच्या गोष्टी घडल्या अशा प्रकारामागे विविध समाजातील फक्त दोन टक्के लोक असतात जे कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करतात. या लोकांना आपणच जागेवर आणू शकतो. आषाढी एकादशी व पवित्र बकरी ईद एकाच दिवशी आहे. सण-उत्सव एकमेकांच्या हातात हात घालून येतात मग आपण देखील अशाच प्रकारे हातात हात घालून एकत्रितपणे सर्व सण-उत्सव साजरे करावे, असे आवाहन श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांनी केले. नेवासा येथे मंगळवारी शांतता समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या.

- Advertisement -

व्यासपीठावर पोलीस निरीक्षक विजय करे, नायब तहसीलदार सी. बी. बोरुडे, उपनगराध्यक्ष लक्ष्मण जगताप, नंदकुमार पाटील, मुस्लिम समाजाचे नेते मुसा ईनामदार, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव कोलते, शिव सहकार सेनेचे बालेंद्र पोतदार, कृषीतज्ञ अशोकराव ढगे, राजेंद्र मापारी आदी उपस्थित होते.

श्रीमती भोर म्हणाल्या, सोशल मीडियावर धार्मिक पोस्ट पडतात. यातून मतभेद निर्माण होतात. जास्त पोस्ट तरुण वर्ग व्हायरल करतात. तरुण वर्गाला यागोष्टींचे परिणाम ज्येष्ठ नागरिकांनी समजावून सांगावे. कोणीही कायदा हातात घेऊ नये. आम्ही आहोत आपण सर्वांनी सण आनंदात साजरे करा. खाकी हीच आमची जात व धर्म असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करा. चांगल्या कार्यात बाधा आणणार्‍यांची गय केली जाणार नाही. त्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचा इशारा दिला.

याप्रसंगी नगरपंचायत अधीक्षक रवींद्रकुमार गुप्ता, शिवाजीराव कोलते, पोलीस पाटील रजिया शेख, जालिंदर गवळी, रावसाहेब मगर, शिवा राजगिरे, अब्दुल हमीद शेख, सुधाकर काळे, गोरख घुले, सतिष सलीम शहा, गायके, पंकज जेधे, नगरसेवक संदीप बेहळे , सुनील वाघ, दिनेश व्यवहारे, मतींन ईनामदार, आदेश साठे, अंजली संतोष काळे, स्मिता लवांडे, मंगल सावंत, फकीरमहंमद शेख, संजय वाकचोरे, मनसेचे संतोष गव्हाणे, रवींद्र पिपळे, राजू इनामदार, बाळकृष्ण भागवत, राहुल चिंधे, संतोष पवार, राजेंद्र कडू, शरीफ शेख, कासम शेख, शकील इनामदार, दिलीप पटारे, एकनाथ कोतकर, संदीप लहारे, सुभाष भांगे, मुसीम शेख, दिगंबर सोनवणे यांच्यासह शहरातील सर्वधर्मीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दहा-पंधरा वर्षांपूर्वी शांतता कमिटीची बैठक वगैरे काही होतं नव्हती. हे फक्त सोशल मीडियावर व्हायरल होणार्‍या अफवांमुळे होत आहे. पोलीस निरीक्षक करे हे जातीयवादी नाहीत. तालुक्यातील लोकांचे हेच मत आहे. सर्वधर्मीय बांधव एकत्रितपणे आहोत पुढे देखील राहू.

– रजिया शेख पोलीस पाटील

- Advertisment -

ताज्या बातम्या