Thursday, April 25, 2024
Homeनगरशेवगाव तालुक्यात भरारी पथकांची नियुक्ती

शेवगाव तालुक्यात भरारी पथकांची नियुक्ती

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

तालुक्यातील कृषी केंद्राद्वारे शेतकर्‍यांना वेठीस धरून बियाणे व खते अधिक भावाने विकली जाऊ नयेत. म्हणून तहसीलदार छगन वाघ यांच्या आदेशानुसार बुधवारी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

यात तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले, कृषी अधिकारी कानिफनाथ मरकड, पंचायत समितीचे कृषी अधिकारी राहुल कदम यांनी शहरातील सर्व कृषी केंद्रांना लगेच भेटी देऊन याबाबतच्या सक्त सूचना जारी केल्या आहेत. तहसीलदारांनी बोलवलेल्या बैठकीस कृषी अधिकारी टकले, शेवगाव मंडल कृषी अधिकारी कानिफ मरकड, पंचायत समितीचे कृषी अधिकारी राहुल कदम , शेवगाव पोलीस निरीक्षक विलास पुजारी, गुप्तवार्ता विभागाचे बप्पासाहेब धाकतोडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे , जिल्हाउपाध्यक्ष दत्ता फुंदे, तालुकाध्यक्ष प्रशांत भराट, बाळासाहेब फटांगरे, नारायण पायघन, नाना कातकडे, अमोल देवढे, मच्छिंद्र आरले, अशोक भोसले, पत्रकार उपस्थित होते.

यावेळी शेतकर्‍यांना अधीकृत किमतीत बियाणे व खते उपलब्ध व्हावीत. महत्त्वाच्या बियाण्याची कमतरता आहे. त्याचा पुरवठा वाढवावा. खते व बी बियाणे विक्री करणार्‍या दुकानात कृषी सहायकांची नेमणूक करावी. चढ्या भावाने विक्री करणार्‍या व काळाबाजार करणार्‍या दुकानदारावर सक्त कारवाई करावी अशा मागण्या कार्यकर्त्यांनी केल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या