Saturday, April 27, 2024
Homeनगरमेथी, कोंथिबीरीचे भाव कोसळ्याने शेतकरी अडचणीत

मेथी, कोंथिबीरीचे भाव कोसळ्याने शेतकरी अडचणीत

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

मेथी व कोंथबिरीचे दर कोसळल्याने शेतकरी मोठ्या आर्थीक आडचणीत सापडला आहे. बी – बियानाचेही पैसे वसुल होत नाही तर मजुराना पदरमोड करुन माजुरी द्यावी लागत असल्याचे पारनेर तालुक्यात चित्र आहे.

- Advertisement -

ऐकीकडे टमाटो मोठे भाव खात आसताना मेंथी कोथिंबीर मात्र शेतकर्‍यांना फेकून देण्याची वेळ आली आहे. मागील एक दोन महिन्यात पावसाने खुप ओढ दिली आहे. अनेक ठिकाणी खरीपाच्या पेरण्या झाल्या नाहीत. त्यामुळे बहुतांशी ठिकाणी शेते मोकळी होती. परंतु मागील काही दिवसापासून रिमझिम पाऊस पडत आहे. खरीप हंगाम तर गेलाच आहे व रब्बीला आजुन थोडा आवकाश आहे व समाधानकारक पाणीही झाले नाही. म्हणून आहे त्या वावरात शेतकरी दोन पैसे मिळवण्यच्या उद्देशाने भाजीपाला पिकाची लागवड करताना दिसत आहे.

जुनच्या शेवटच्या टप्प्यात व जुलै सुरवातीला थोड्याफार पावसावर शेतकर्‍यांनी मेथी धने शेतात टाकले. जुलै च्या पहिल्या आठवड्यात मेथी कोथिंबीरीला चांगला बाजार भाव होता. परंतु गेल्या आठ दिवसांपासुन मेथी कोथिंबीर मातीमोल भावाने विकली जाऊ लागली आहे. बाजार पडण्याचे मुख्य कारण मोठ्या प्रमाणात मेथी व कोथिंबीर बाजारत विक्रीसाठी आल्याचे व्यापारी सांगत आहेत.

मेथीं बियाने 100 ते 120 रुपये किलो आहे. तर कोथिंबीर (धने) 80 ते 90 रुपये किलो आहे. तर मेथी कोथिंबीर उपटण्यासाठी एका महिलेला 300 रुपये मजुरी आहे. शिवाय त्या गड्डूया बांधने, धुने, सुकवने व पुढे बाजारत विक्रीसाठी नेणे, तेथे पुन्हा आडत बाजारपट्टी या गोष्टी आल्याच व हे सर्व करून मालाला मातीमोल भाव मिळत आहे. वरील सर्व खर्च हिशेब करता गुंतवणूक केलेली रक्कम ही मिळत नसुन बळीराजाचे कुटुंब भर पावसात फुकट राबताना दिसत आहे.

अगोदरच पाऊस झाला नसल्याने खरीपाचे सर्व पिके वाया गेली आहेत. त्यानंतर या रिमझिम पावसावर दोन पैसे मिळतील या आशेवर शेतकर्‍यांनी मेथी, कोथिंबीरीचा जुगार खेळला परंतु तेथेही नशिबानी साथ न दिल्याने शेतकर्‍यांचे भांडवलही गेले. आणि आडचणीत भरच पडली आहे.

अशोक सुर्यभान गावखरे, शेतकरी, चास

- Advertisment -

ताज्या बातम्या