डॉ.मनीषा काकडे यांनी मिळविली फेलोशिप

jalgaon-digital
1 Min Read

औरंगाबाद – Aurangabad

शहरातील प्रसिद्ध स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ.मनीषा काकडे (Dr. Manisha Kakade) यांना फेलोशिप इन कोल्पोस्कोपी अँड सर्व्हीकल कॅन्सर या विषयाची सर्वोच्च फेलोशिप (Fellowship) मिळाली आहे. ऑब्जेक्टिव्ह स्ट्रक्चर्ड क्लिनिकल एक्झाम अर्थात ओएससीई या परीक्षेत यश संपादित करत त्यांनी ही फेलोशिप मिळवली आहे.

कोरोनाकाळामुळे (corona) ऑनलाइन पद्धतीने झालेल्या व्हायवा सादरीकरणात अनेक देशातील तज्ज्ञांच्या प्रश्नांची उत्तरे डॉ. मनीषा काकडे यांनी दिली. डॉ. मनीषा काकडे या गेल्या ८ वर्षांपासून योनीमार्ग व गर्भपिशवीच्या मुखाचा कॅन्सर या विषयात काम करत आहेत. त्यांनी शहरी तसेच ग्रामीण भागात विविध शिबिरांच्या माध्यमातून गर्भपिशवीच्या कॅन्सरविषयी महिलांमध्ये जनजागृती करण्याचे कार्य सातत्याने केले आहे.

गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा जगातील सर्वाधिक रुग्ण असलेला दुसऱ्या क्रमांकाचा कॅन्सर असून दर मिनिटाला या कॅन्सरमुळे एक महिला आपला जीव गमावत आहे. त्यामुळे याविषयी जनजागृती होणे अतिशय गरजेचे आहे. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांमुळे हा कॅन्सर वेळीच ओळखून त्याचे निदान व उपचार केले जाऊ शकतात. न्यू स्प्रिंग आयव्हीएफ अँड फर्टिलिटी सेंटरमध्ये मॉड्यूलर आयव्हीएफ लॅब, मॉड्यूलर आयव्हीएफओटी, आययूआय रूम, कन्सल्टिंग रूम, समुपदेशन कक्ष, रिसेप्शन चौकशी डेस्क, वेटिंग एरिया, मेडिकल स्टोअर, कॉन्फरन्स हॉल, पॅथॉलॉजी लॅब, जन्मपूर्व, प्रसुतीपूर्व, पेरिमिनोपॉज, पोस्ट रजोनिवृत्ती, पुनर्वसन, फिजिओथेरपी सेंटर अशा सुविधा दिल्या जातात, असेही न्यू स्प्रिंग आयव्हीएफ अँड फर्टिलिटी सेंटरच्या संचालिका व वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ. मनीषा काकडे यांनी नमूद केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *