करोनात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना शुल्कमाफी

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

करोनाच्या (corona ) साथीत ज्या विद्यार्थ्यांना आई, वडील गमवावे लागले, अशा विद्यार्थ्यांचे पदवी,पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करण्यात येत असल्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत ( Higher and Technical Education Minister Uday Samant) यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. या घोषणेमुळे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

अनुदानित महाविद्यालय(Non Granted colleges ) आणि विद्यापीठी विभागातील सर्व अभ्यासक्रमासाठी आकारण्यात येणाऱ्या इतर शुल्कांमधील जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन, उपक्रम शुल्क, कॉलेज मॅगेजीन शुल्क, संगणक शुल्क, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत निधी आणि युथ फेस्टिवल अशा ज्या बाबींवर कोणत्याही प्रकारे खर्च आकारण्यात आलेला नाही. त्या बाबींसाठी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

प्रयोगशाळा आणो ग्रंथालय यांची देखभाल, ग्रंथालयामध्ये ई-कन्टेंट विकत घेण्यासाठी खर्च करण्यात आला असल्याने याबाबतच्या शुल्कामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येईल. विद्यार्थ्यांद्वारे वसतीगृहाचा उपयोग करण्‍यात येत नसल्याने वसतीगृह शुल्कापोटी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ होणार आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली.

विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयांद्वारे आकारण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क आणि विकास निधी यामध्ये सवलत देण्यात येणार नाही. परंतु इतर शुल्कामधील जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन,उपक्रम शुल्क, कॉलेज मॅगेजीन शुल्क, संगणक शुल्क, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत निधी आणि युथ फेस्टिवल अशा ज्या बाबींवर कोणत्याही प्रकारे खर्च आकारण्यात आलेला नाही,त्या बाबींसाठी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रयोगशाळा आणि ग्रंथालय शुल्क यामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येईल, असेही उदय सामंत यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *