Saturday, April 27, 2024
Homeजळगावनो-ड्यूज प्रमाणपत्राच्या माध्यमातून ‘फी’ वसुलीचा नवा फंडा !

नो-ड्यूज प्रमाणपत्राच्या माध्यमातून ‘फी’ वसुलीचा नवा फंडा !

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

यावर्षी पदवी पदव्यतुत्तर वर्गाच्या अंतीम वर्ष सत्र परीक्षा कोविडमुळे ऑनलाईन घेण्यात आल्या होत्या.

बहुतांश विद्यार्थ्यांचे पालक शेतकरी आहेत. त्यामुळे गतवर्षी अतीवृष्टीमुळे शेतकरी पाल्यांची महाविद्यालयीन परीक्षा शुल्क माफ करण्यात आले होते. तसेच यावर्षी देखिल कोणत्याही विद्याशाखांची शैक्षणिक शुल्कवाढ विद्यापिठ प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही.

- Advertisement -

पी.पी.पाटील, कुलगुरू, बहिणाबाई चौधरी विद्यापीठ

त्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडून संबंधित महाविद्यालयांकडे टिसी घेण्यासाठी अर्ज केले असता नोड्यूज प्रमाणपत्राच्या माध्यमातून व्दितीय वर्षाची फी बाकी असल्याचे दाखवून आर्थिक लूट केली जात आहे.

पुढच्या शिक्षणासाठी स्थलांतर प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याने विद्यार्थ्यांकडून नाईलाजास्तव या अवाजवी मागणीचा भरणा ऑनलाईन वा रोखीने केला जात आहे. याची पोच पावती देखील देण्यात येत नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगीतले

दरवर्षी मे महिन्यात पदवी पदव्युत्तर वर्गांच्या परीक्षा होउन बरेच विद्यार्थ्यांकडून पुढील शिक्षणासाठी स्थलांतर प्रमाणपत्र दाखल्यासाठी महाविद्यालयांकडे मागणी केली जाते. परंतु यावर्षी कोविड-19 मुळे परीक्षा न घेताच पदवी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

दि. 13 मार्च 2020 पासून राज्य शासनाच्या निर्देशानुसार कोविड संसर्ग प्रतिबंध टाळण्यासाठी इयत्ता 10वी 12वी च्या शालांत परीक्षा सुरु असतांनाच दि. 24 मार्च पासून शाळा, महाविद्यालये यासह रेल्वे, खासगी वाहतुक व अन्य सेवादेखील तात्काळ बंद करण्यात आल्या होत्या.

त्यानंतर सर्वच शाळा महाविद्यालयीन परीक्षादेखील शासन निर्णय येई पर्यंत लांबणिवर टाकण्यात आल्या होत्या. त्यामुळे तब्बल सहा ते सात महिने उशिराने युजीसीच्या नियमाप्रमाणे परीक्षा न घेताच पदवी प्रमाणपत्र देता येत नाही.

या निर्णयामुळे श्रेयवादात सत्रांत परीक्षा हो नाही करता आक्टोबर अखेर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. वास्तविक विद्यार्थ्यांकडून महाविद्यालय नियमानुसार शैक्षणिक शुल्क प्रवेशावेळीच घेण्यात येते.

या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक शुल्क वा परीक्षा शुल्क वेळेवर भरणा करूनही या विद्यार्थ्यांकडून दुसर्‍या वर्षाची फि बाकी असल्याच्या नावाखाली 1500 ते 2500 रूपये फि मागणी केली जात आहे.

हि बाकी भरणा केल्याशिवाय स्थलांतर प्रमाणपत्र (टिसी) देत नसल्याचे विद्यार्थ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगीतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या