Friday, April 26, 2024
Homeनगरजैन अल्पसंख्यांक महासंघाचे उद्या राज्यव्यापी आंदोलन

जैन अल्पसंख्यांक महासंघाचे उद्या राज्यव्यापी आंदोलन

बेलापूर |वार्ताहर| Belapur

येथील प्रतिथयश व्यापारी गौतम हिरण यांचे 1 मार्च रोजी अपहरण होऊन निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह 6 दिवसांनी सापडला.

- Advertisement -

पोलीसांच्या निष्क्रियतेमुळे हा बळी गेल्याची महाराष्ट्रातील व्यापारी वर्ग व समाजाची भावना असुन या अपहरणाचे व खुन्यांचे सुत्रधार व आरोपी यांनी पकडून योग्य शासन होण्यासाठी अखिल भारतीय जैन अल्पसंख्यंक महासंघाफ तर्फे बुधवारी राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहीती राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी व राष्ट्रीय महामंत्री संदीप भंडारी यांनी दिली.

व्यापारी गौतम हिरण यांचे 1 मार्च रोजी अपहरण झाल्यापासुन अखिल भारतीय जैन अल्पसंख्यंक महासंघ ने राज्य सरकारकडे त्यांचा तपास करण्याची आग्रही मागणी केली होती. राज्याचे गृहमंत्री, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. दुर्देवाने तपास न होता थेट गौतम हिरण यांचा मृतदेहच मिळाला.

गौतम हिरण यांच्या अपहरण व निर्घृण हत्येमुळे हिरण कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला असुन हे कुटुंब अद्यापही या धक्यातुन सावरलेले नाही. बेलापुरपासुन अवघ्या 10 किलोमीटर वर मृतदेह मिळाला तर पोलीसांना तपासात कसा आढळला नाही. याबाबत व्यापारी वर्गात, समाजात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

या अपहरकर्त्या खुन्यांना ताबडतोब शोधुन त्यांना कठोर शासन व्हावे यासाठी जैन समाजाची राष्ट्रीय शिखर संस्था अखिल भारतीय जैन अल्पसंख्यंक महासंघफ तर्फे बुधवार दि. 10 मार्च रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येत असल्याचे ललित गांधी यांनी जाहीर केले. यावेळी संपुर्ण राज्यात व्यापारी वर्ग व जैन समाजातर्फे निदर्शने करण्यात येणार असुन स्थानिक प्रशासन, जिल्हाधिकारी, जिल्हापोलीस प्रमुख यांना निवेदन देण्यात येणार आहे. तसेच सर्व व्यापारी दिवसभर काळ्या फीती लावुनच कामकाज करतील.

तसेच एक आठवड्याच्या आत खुन्यांवर कार्रवाई नाही झाली तर संपुर्ण देशभर या विरोधात आंदोन उभारण्यात येईल असा ईशाराही ललित गांधी व संदिप भंडारी यांनी दिला.

सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय दर्डा यांनी या हत्येचा तीव्र निषेध व्यक्त केला असुन यातील आरोपींना तात्काळ अटक करावी अशी राज्यशासनाकडे मागणी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या