Thursday, April 25, 2024
Homeनगरसुऱ्याचा धाक दाखवून व्यापाऱ्याला लुटले

सुऱ्याचा धाक दाखवून व्यापाऱ्याला लुटले

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)-

लोखंडी सुऱ्याचा धाक दाखवून व्यापाऱ्याला लुटल्याची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकाजवळील भाईभाई गॅरेजसमोर शुक्रवार दि. ११ डिसेंबर रोजी रात्री साडे दहाच्या वाजेच्या सुमारास घडली आहे.

- Advertisement -

याबाबत सविस्तर माहिती अशी की, घरी निघालेल्या शहरातील एका व्यापाऱ्यास रस्त्यात अडवत लोखंडी सुऱ्याचा धाक दाखवून व्यापाऱ्याजवळील ४ लाख ९८ हजार नऊशे रुपयांची रोख रकमेसह मोबाईल चोरटयांनी चोरून नेला. शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकाजवळील भाईभाई गॅरेजसमोर शुक्रवार दि. ११ डिसेंबर रोजी रात्री साडे दहाच्या वाजेच्या सुमारास घडली असून याबाबत चार अज्ञात चोरट्यांविरुध्द कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

- Advertisment -

ताज्या बातम्या