Friday, April 26, 2024
Homeनगरचाकूचा धाक दाखवून सव्वा लाख लुटले

चाकूचा धाक दाखवून सव्वा लाख लुटले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वाहन चालकास चाकूचा धाक (Fear of the Knife) दाखवून एक लाख 13 हजार 50 रूपयांची रक्कम तिघा चोरट्यांनी (Theft) काढून घेतली. मंगळवारी पहाटे नगर-पुणे रोडवरील (Nagar Pune Road) चास (ता. नगर) शिवारात माथेरान हॉटेलजवळ ही घटना घडली. या प्रकरणी वाहन चालक अरविंद रामदास डरंगे (वय 30 रा. सारसनगर, नगर) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात (Nagar Taluka Police Station) दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात तिघांविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

- Advertisement -

टँकर पलटी होताच नागरिकांची डिझेलसाठी धावपळ

मंगळवारी पहाटे फिर्यादी त्यांच्याकडील पिकअप वाहन घेऊन नगर-पुणे रोडवरून जात असताना त्यांना दुचाकीवरील तिघांनी चास शिवारातील माथेरान हॉटेलजवळ अडविले. गाडीचा कट मारला म्हणून फिर्यादीला शिवीगाळ करत खाली ओढले. चाकूचा धाक दाखवून पिकअपमध्ये ड्रायव्हार साईटच्या पाठीमागे ठेवलेली रक्कम व फिर्यादीकडील पाकीटामधील रक्कम अशी एक लाख 13 हजार 50 रूपयांची रक्कम घेऊन पलायन केले. घडलेल्या प्रकाराची माहिती नगर तालुका पोलिसांना देण्यात आली. गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण करीत आहेत.

काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनचा 25 टन तांदूळ जप्तराज्य नाट्य स्पर्धा 2022 : ‘एका उत्तराची कहाणी’

- Advertisment -

ताज्या बातम्या