Wednesday, April 24, 2024
Homeनाशिककरंजवणमध्ये बिबट्याची दहशत; नागरिक भयभीत

करंजवणमध्ये बिबट्याची दहशत; नागरिक भयभीत

ओझे | वार्ताहर | Oze

दिंडोरी तालुक्यातील (Dindori taluka) करंजवण (Karanjavan) येथील पिंगळे वस्तीवर बिबट्याने (Leopards) गेल्या पाच दिवसांपासून धूमाकुळ घातला आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ बिबट्या भाऊसाहेब पिंगळे (Bhausaheb Pingale) यांच्या वस्तीवर येण्याचा प्रयत्न करीत आहे…

- Advertisement -

या वस्तीवरील लोकांच्या ग्रामस्थ मोठमोठ्याने आवाज करून बिबट्याला पळून लावत आहे. याबाबत वनविभागाला अनेकवेळा दूरध्वनीवरून माहिती देवूनदेखील वनविभाग (Forest Department) याकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार रावसाहेब पिंगळे (Raosaheb Pingale) यांनी केली.

सध्या या परिसरात शेतीची कामे जोरात चालू आहेत. शेतात काम केल्याशिवाय मजुरांना पर्याय नाही. पंरतु, बिबट्याच्या भीतीने शेतकऱ्यांसह मजुरांमध्ये बिबट्यांची दहशत निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे करंजवण येथील शाळा चालू झाली आहे. त्यामुळे वस्त्यावरील लहान मुले गावात शाळेत जात आहे. मात्र बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्यामुळे पालक मुलांना शाळेत पाठवत नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

पंधरा दिवसांपूर्वी बिबटयाने लखमापूर (Lakhmapur) येथील माजी उपसरपंच वाल्मिक मोगल (Valmik Mogal) यांच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांवर हल्ला केला होता. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

करंजवण व ओझे परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याचे प्रकार घडले आहेत. मात्र वनविभागाला वारंवार सूचना देऊनदेखील याबाबत दखल घेतली जात नाही. वनविभागाचे तालुका वनअधिकारी फोन घेत नाहीत, याची प्रशासनाने दखल घेण्याची आवश्यकता आहे.

एखादी घटना घडल्यानंतर सर्व वनविभागाचा ताफा तेथे हजर होतो मात्र घटना घडू नये यासाठी वनविभाग कोणतेही पाऊल उचलताना दिसत नाही. करंजवण, ओझे, म्हैळूस्के, लखमापूर हा कादवा नदीचा परिसर आहे. या गावांमध्ये मोठ्याप्रमाणावर ऊसाची शेती आहे.

त्यामुळे कादवा नदी परिसरातील गावांमध्ये बिबट्याचा मुक्तसंचार दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. यासाठी वनविभागाने या ठीकानीन पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या