Friday, April 26, 2024
Homeनगरकरोना काळात कर्तव्यात कसूर, दोघा शिक्षकांना नोटीसा

करोना काळात कर्तव्यात कसूर, दोघा शिक्षकांना नोटीसा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना काळात कर्तव्यात कसूर करण्यार्‍या दोन शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. नगरचे तहसीलदार यांनी या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहे. नगर तालुक्यास जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांवरील ही पहिलीच कारवाई आहे.

- Advertisement -

सध्या जिल्ह्यात अन्य तालुक्याच्या तुलनेत नगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात करोनाचा प्रादुर्भाव असून तो सातत्याने वाढत आहे. यामुळे प्रशासनाकडून दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर उपाययोजना केल्या जात आहेत. विविध उपायायोजना करण्यासाठी प्राथमिक शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. गावातील विलगीकरण कक्षात रुग्णांच्या नोंदी ठेवणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, कोविड सेंटर व लसीकरण केंद्र आदी ठिकाणी शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. प्राथमिक शिक्षकांकडून करोना या जागतिक आपत्ती काळात मोलाचे योगदान मिळत आहे. आरोग्य, महसूल, पोलीस यंत्रणा सोबत ग्रामस्तरावर तलाठी, ग्रामसेवक यांच्या सोबत प्राथमिक शिक्षक मोलाची भुमिका बजावत आहेत.

मात्र, ग्रामस्तरावर काही लोक करोना काळात नेमणूक दिलेल्या कर्तव्याकडे जाणूनबुजून पाठ फिरवत आहेत. कर्तव्यात कसूर करण्यार्‍या व हलगर्जीपणा करण्यार्‍या कर्मचार्‍यांवर कडक कारवाई तालुका प्रशासनाने सुरू केली आहे. कर्तव्यात कसूर करणार्‍या राजेंद्र ढगे सहायक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आठवड शरद म्हस्के, सहायक शिक्षक, प्राथमिक शाळा, मांडवे (दोन्ही नगर तालुका) यांना कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा मागितला आहे. करोना आपत्तीच्या काळात व शासकिय कर्मचार्‍यांनी त्यांना नेमून दिलेले कर्तव्य पार पाडावे. यापुढे कर्तव्यात कसूर करणार्‍या कर्मचार्‍यांची गय केली जाणार नाही. तसेच सर्व कर्मचार्‍यांनी एकजुटीने प्रयत्न करून आपला तालुका लवकरात लवकर करोना मुक्त करावा असे आवाहन तहसिलदार उमेश पाटील यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या