Thursday, April 25, 2024
Homeनगरसासर्‍याने पेटविली जावयाची झोपडी

सासर्‍याने पेटविली जावयाची झोपडी

गणेशवाडी |वार्ताहर| Ganeshwadi

ऊस तोडणी कामगाराची झोपडी त्याच्या सासर्‍याने पेटवून दिल्याची घटना नेवासा तालुक्यातील मुळा कारखाना गट ऑफिसलगत घडली.

- Advertisement -

याबाबत तोडणी कामगाराच्या फिर्यादीवरुन सोनई पोलीस ठाण्यात सासर्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, गाडी यार्ड मधील तोडणी कामगार असलेले अविनाश दादाहरी सावंत मुळा कारखाना गट ऑफिसजवळ मुळा कारखान्याच्या मालकीच्या जागेत झोपडी टाकुन राहत होते. या झोपडीत त्याची आई कलाबाई व वडील दादाहरी असे एकत्र राहत होते. माझी पत्नी डिलेव्हरीसाठी माहेरी सोनई खरवंडी रोड येथे गेली असता, मी व माझी आई पत्नीस भेटण्यास गेलो असता, मी पत्नीबरोबर बोलत असताना सासरे भिमराव शिंदे, मेव्हणा बालु साहेबराव शिंदे या दोघांनी बायकोला भेटायला आत्ता सुचले का? असे म्हणून मारहाण करुन दमदाटी केली.

आम्ही मुळा कारखाना येथिल झोपडीत आलो. दि. 18 रोजी रात्री जेवण करुन झोपडीबाहेरील मोकळ्या जागेत झोपलो असता. रात्री 1 ते 1:30 च्या सुमारास आम्ही गाढ झोपेत असताना अचानक मला जाग आली. झोपडीच्या पाठीमागून आग लागलेली दिसली. त्यानंतर माझी आई व वडील जागे झाले.

इतर लोकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. बाजुस शोधाशोध घेत असताना माझे सासरे व मेव्हणा हे दोघे पळताना दिसले. आम्ही आरडाओरड केली असता, ते मोटारसायकलवर बसून पळुन गेले. शेजारी राहणार्‍या शिवाजी राजाराम शिंदे व इतर उस तोड कामगारांनी आग विझवण्यास प्रयत्न केले. दरम्यान मुळा करखान्याची अग्नीक्षामक घटनास्थळी दाखल झाली. व आग विझविण्यात आली.

अविनाश दादाहरी सावंत यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 436, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल प्रविण आव्हाड करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या